इंडिया आघाडीचे आज दिल्लीत शक्तिप्रदर्शन

इंडिया आघाडीचे आज दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा: विरोधकांच्या इंडिया आघाडीचे रविवारी (दि. ३१) दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. इंडिया आघाडीतील घटकपक्ष असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने अटक केली. त्यासोबतच विरोधी पक्षांवर होत असलेल्या कारवाया या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीची मोठी सभा दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे. (Lok Sabha Election 2024)
दिल्लीत आज(दि.३१) होणाऱ्या या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्यासह शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ असा नारा देत आम आदमी पक्षाने देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी या सभेचे आयोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या सभेकडे आहे. (Lok Sabha Election 2024)
हे ही वाचा:

Lok Sabha Election 2024 | कडक उन्हात प्रचारही ‘तापणार’!
Lok Sabha Election 2024 : ज्याला पाडायचे त्याला पाडा; मनोज जरांगे यांचे आवाहन
Lok Sabha Election 2024 : महायुतीचा चार-पाच जागांवर तिढा

Latest Marathi News इंडिया आघाडीचे आज दिल्लीत शक्तिप्रदर्शन Brought to You By : Bharat Live News Media.