बोपण्णा-एडबेनची ऐतिहासिक कामगिरी; पटकावले मियामी ओपनचे जेतेपद

बोपण्णा-एडबेनची ऐतिहासिक कामगिरी; पटकावले मियामी ओपनचे जेतेपद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी क्रोएशियाच्या डोडिग आणि अमेरिकाच्या क्राएसेकचा मियामी ओपन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात 6(3)-7(3), 6-3, 10-6 अशा फराकाने पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. (Miami Open)
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बोपण्णा आणि मॅथ्यू यांनी मार्सेल ग्रॅनॉलर्स आणि होरासिओ झेबॉलोस जोडीचा सरळ सेटमध्ये पराभूत करून मियामी ओपनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन ओपन विजेते बोपण्णा आणि एबडेन यांनी गुरुवारी (दि. 28)  स्पेनच्या ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या झेबॉलोस यांचा 6-1, 6-4 अशा फरकाने पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Your 2024 #MiamiOpen Men’s Doubles Champions! 💥@rohanbopanna | @mattebden | @atptour | @itau pic.twitter.com/2MzGA81DvJ
— Miami Open (@MiamiOpen) March 30, 2024

हेही वाचा :

वसंत मोरेंच्या जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा
LSG vs PBKS : लखनौचा नवाबी थाटात विजय; पंजाब किंग्ज 21 धावांनी पराभूत
दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी; अखेर शरद पवार गटाचा सस्पेन्स संपला

Latest Marathi News बोपण्णा-एडबेनची ऐतिहासिक कामगिरी; पटकावले मियामी ओपनचे जेतेपद Brought to You By : Bharat Live News Media.