‘एकट्याने हल्ले करून हिंसाचार घडवा’ : इस्लामिक स्टेटचे समर्थकांना आवाहन

‘एकट्याने हल्ले करून हिंसाचार घडवा’ : इस्लामिक स्टेटचे समर्थकांना आवाहन


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (IS-Central) जगभरातील त्यांच्या पाठीराख्यांना Lone Wolf प्रकारे म्हणजे एकट्याने हल्ले करून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे देशातील तपाससंस्था आणि सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. इस्लामिक स्टेटने २०१४ला खिलाफतच्या स्थापनेची घोषणा केली आहे, त्याला या वर्षी दहा वर्षं होत आहेत, त्यामुळे तपाससंस्था अलर्टवर आहेत. (Islamic State)
इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता अबू हदायफा अल अन्सारी याने हे आवाहन केलेले आहे. अन्सारी याने एका ऑडिओ क्लिपमधून हा संदेश दिला आहेत. यात मॉस्कोवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे कौतूक केले आहे आणि जगभरातील मुस्लिमांना इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
ISISया दहशतावी संघटनेची स्थापना १९९९ला झाली. त्यानंतर २०१४मध्ये याचे नाव इस्लामिक स्टेट असे करण्यात आले आणि अबू बक्र अल बगदादी याची निवड खलिफा म्हणून करण्यात आली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अन्सारी इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता आहे. अन्सारी याने जानेवारी महिन्यात अशाच प्रकारची ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली होती. (Islamic State)

Islamic State calls for massacre by ‘lone wolves’, agencies on alert https://t.co/jLTAcBJCsq
— Capt Harish Pillay (@captpillay) March 30, 2024

अन्सारीच्या ऑडिओ क्लिपनंतर जगभरात तसेच भारतातही तपाससंस्था सतर्क झालेल्या आहेत. “स्थानिक पोलिसांनी अधिक सतर्क राहावे. सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, संमेलनं अशा ठिकाणी अधिक दक्षता घ्यावी.”
अन्सारी याच्या ऑडिओमध्ये ज्यू आणि ख्रिस्ती धर्मीयांचा उल्लेख आला आहे. त्यामुळे ज्यू संस्था, सार्वजनिक सभागृहात विशेष सुरक्षा देण्यात आली आहे, यात मुंबईतील छाबड हाऊसाही समावेश आहे.
हेही वाचा

Suicide Blast In Islamabad : इस्लामाबादमध्ये आत्मघातकी स्फोटात पोलीस ठार : ६ जण जखमी

Moscow concert hall attack | मॉस्को कॉन्सर्ट हॉल हल्ला: ३ संशयितांनी कोर्टात गुन्हा केला कबूल

Moscow Concert Hall Attack : ‘IS खोरासान’ किती धोकादायक? रशियावर दहशतवादी हल्‍ला का केला?

The post ‘एकट्याने हल्ले करून हिंसाचार घडवा’ : इस्लामिक स्टेटचे समर्थकांना आवाहन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source