…अखेर तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक

…अखेर तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक

सेन्सेक्स-निफ्टीचे निर्देशांक प्रभावीत होत बंद : विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारात दबावाची स्थिती
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी मागील तीन दिवसांच्या तेजीला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार लोकसभा निवडणूक व राजकीय स्थिती काळजीत असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात समभाग खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान बुधवारच्या सत्रात एचडीएफसी बँक, एशियन पेन्ट्स, टाटा मोर्ट्स, सनफार्मा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या समभागात झालेल्या विक्रिच्या दबावामुळे भारतीय बाजारात मागील तीन सत्रांनी प्राप्त केलेली तेजी अखेर थांबली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक हे संपूर्ण सत्रात आपली तेजी कायम ठेवण्याच्या प्रयत्नात राहिले होते. अंतिमक्षणी बीएसई मिडकॅप 0.6 तर स्मॉलकॅप 0.96 टक्क्यांनी वधारले आहेत.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 117.58 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 72,987.03 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 17.30 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 22,200.55 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये बुधवारी टाटा मोर्ट्स, एशियन पेन्ट्स, एचडीएफसी बँक, जेएसडब्लू स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया आणि टायटन यांचे निर्देशांक हे प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प, एनटीपीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, लार्सन अॅण्ड टुब्रोसह एचसीएल टेक यांचे समभाग हे नफा कमाईसह बंद झाले आहेत.
जागतिक घडामोडींमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की हा नफा कमाईत राहिला आहे. तर चीनचा शांघाय कम्पोजिट नुकसानीत होता. दक्षिण कोरियाचा आणि हाँगकाँगचा बाजार बंद होता. युरोपमधील मुख्य बाजारात जास्ती करुन तेजीचा कल होता. अमेरिकन बाजार वॉलस्ट्रीट हा मंगळवारी तेजीत होता. तसेच जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 0.21 टक्क्यांनी वधारुन 82.55 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते.