RSS कडून एका व्यक्तिविरोधात पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: उपराजधानीतील सामाजिक कार्यकर्ते ‘RSS’शी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मिळत्याजुळत्या नावाने संघटना स्थापन करणाऱ्या जनार्दन मूनविरोधात तक्रार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या प्रकाराविरोधात निवडणूक आयोग तसेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याचे आरएसएसने स्पष्ट केले आहे. (Nagpur News) मून यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन ‘आरएसएस’चा निवडणूकीत काँग्रेसला पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले होते. तसा व्हिडीओ … The post RSS कडून एका व्यक्तिविरोधात पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार appeared first on पुढारी.

RSS कडून एका व्यक्तिविरोधात पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: उपराजधानीतील सामाजिक कार्यकर्ते ‘RSS’शी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मिळत्याजुळत्या नावाने संघटना स्थापन करणाऱ्या जनार्दन मूनविरोधात तक्रार केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या प्रकाराविरोधात निवडणूक आयोग तसेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याचे आरएसएसने स्पष्ट केले आहे. (Nagpur News)
मून यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन ‘आरएसएस’चा निवडणूकीत काँग्रेसला पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले होते. तसा व्हिडीओ त्यांनी सोशल माध्यमांवर व्हायरल केला यामुळे समाजात संभ्रम निर्माण केला गेला. संघाचे नाव घेत निवडणूकीच्या काळात मून यांनी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संघाचे महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे यांनी एका पत्रातून केला आहे. (Nagpur News)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात १९२५ साली झाली. आता शतकपूर्तीसाठी कार्यक्रम नियोजन सुरू आहे. बोकारे यांच्या तक्रारीनुसार, मून यांनी काही कालावधीपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावानेच संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सहायक निबंधकांनी त्याला नकार दिला होता. मून यांनी याविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र दोन्ही न्यायालयांनी ही याचिका नामंजुर केली होती. (Nagpur News)
मून यांच्या नावावर ‘आरएसएस’ नावाची कुठलीही संस्था नोंदणीकृत नाही. मात्र तरीदेखील विविध ठिकाणी पत्रपरिषदा घेऊन वक्तव्ये करण्यात येत आहे. मून यांचेकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग करण्यात येत असून, हा प्रकार तातडीने थांबविण्यात यावा अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. हा समाजात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असून, मूनविरोधात तातडीने कारवाई करावी व युट्यूबवरून व्हिडीओ डिलीट करण्यात यावा,पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी आरएसएसकडून करण्यात आली आहे.
निवडणूकीच्या काळात संघाचे नाव घेऊन असे प्रकार करण्यात येत आहे. संघाच्या नावावर अशा फेक पोस्ट आल्या तर त्यापासून सावध रहावे. संघाकडून अधिकृत भूमिका केवळ अधिकृत ट्वीटर हँडल किंवा संकेतस्थळावरच मांडण्यात येते असेही यानिमित्ताने रा.स्वसंघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
Latest Marathi News RSS कडून एका व्यक्तिविरोधात पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार Brought to You By : Bharat Live News Media.