Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गठीत केलेल्या जाहीरनामा समितीची आज (दि.३०) घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी या समितीची घोषणा केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीत इतर पक्षांतून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांच्या नावांचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. (Lok Sabha Election BJP Manifesto Committee)
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आहेत. तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निमंत्रक म्हणून पक्षाने जाबाबदारी दिली आहे. या संदर्भातील माहिती भाजपने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे. (BJP Lok Sabha Election)
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने लोकसभा चुनाव-2024 के लिए चुनाव घोषणा-पत्र समिति का गठन किया है।
BJP National President Shri JP Nadda has announced Election Manifesto Committee for the Lok Sabha Elections – 2024. pic.twitter.com/KMrBpqkQQF
— BJP (@BJP4India) March 30, 2024
Lok Sabha Election BJP Manifesto Committee : समितीत पक्षातील २७ सदस्यांचा समावेश
भाजपने नव्याने गठीत केलेल्या समितीमध्ये विविध राज्यातील २७ सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पियुष गोयल यांना सहसंयोजक करण्यात आले आहे. त्याचबरोबर अर्जुन मुंडा, भूपेंद्र यादव, अर्जुनराम मेघवाल यांचाही यामध्ये समावेश आहे. (BJP Lok Sabha Election)
The post भाजपकडून ‘जाहीरनामा’ समिती गठीत; ‘या’ नेत्यांकडे जबाबदारी appeared first on Bharat Live News Media.