रांजण घाट रस्त्याची चाळण : पर्यटक, नागरिकांची गैरसोय

रांजण घाट रस्त्याची चाळण : पर्यटक, नागरिकांची गैरसोय

खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : हायब्रीड अ‍ॅम्युनिटी योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून सिंहगड, राजगड, तोरणा या गडकोटांना जोडण्यासाठी रुंदीकरण केलेल्या वेल्हे तालुक्यातील रांजणे-पाबे घाट रस्त्याची खड्डे पडून चाळण झाली आहे. त्यामुळे पर्यटक, नागरिकांची गैरसोय होत आहे. दुरवस्था झालेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांतून वाहने घसरून खोल दरीत कोसळण्याच्या दुर्घटना घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
घाटाच्या माथ्यावर दोन्ही बाजूंच्या तीव्र चढ, उतारावर खड्डे पडून ठिकठिकाणी रस्ता खचला आहे. घाटात अरुंद वळणे आहेत.
रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर व दुसर्‍या बाजूला खोल दर्‍या आहेत. मुख्य घाटात या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. खिंडीत डोंगराच्या दरडी उन्मळून पडल्या आहेत. अलीकडच्या काळात घाट रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशी या रस्त्यावर पर्यटकांची वर्दळ असते. रुंदीकरणासाठी तोडलेल्या डोंगराचे दगड, मुरूम रस्त्यावर कोसळत असल्याने घाटात रस्ता अरुंद झाला आहे. तसेच, अनेक ठिकाणी संरक्षक कठडेही नाहीत.
या रस्त्यावरील खड्ड्यांत वाहने घसरून अपघात होत आहेत. धोकादायक प्रवासामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी.
-किसनराव जोरी, माजी उपसभापती, हवेली तालुका पंचायत समिती

 हेही वाचा

बलुचींचा प्रकोप !
नागपुरात काँग्रेस नेते सुनील केदार गटाला धक्का; मनोहर कुंभारे भाजपात
Fire accident : रांजे येथील रंगाच्या कंपनीला भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान

Latest Marathi News रांजण घाट रस्त्याची चाळण : पर्यटक, नागरिकांची गैरसोय Brought to You By : Bharat Live News Media.