शुभमन गिलला झटका; स्लो ओव्हर रेटसाठी ठोठावला दंड

शुभमन गिलला झटका; स्लो ओव्हर रेटसाठी ठोठावला दंड

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला दंड ठोठावण्यात आला आहे. सामन्यातील स्लो ओव्हर रेटसाठी गिलला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामातील ओव्हररेटशी संबंधित हा पहिला गुन्हा होता.
गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सविरुद्धचा पहिला सामना ६ धावांनी जिंकला होता. मात्र, गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी (दि.२६) गुजरात टायटन्सला ६३ धावांनी पराभूत केल्याने गिलच्या नेतृत्वाखालील संघाला स्पर्धेच्या चालू हंगामातील पहिला पराभव स्वीकारावा लागला. या हंगामातील दुसरा सामना गिलसाठी चांगला नव्हता. प्रथम गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. नंतर स्लो ओव्हर रेटसाठी त्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या एका निवेदनात म्हटले आहे की, ‘गिलला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, कारण आयपीएलच्या आचारसंहितेनुसार हा त्याच्या संघाचा हंगामातील पहिला गुन्हा होता. (IPL 2024)
हेही वाचा : 

गुजरातविरुद्ध चेन्नईच ‘सुपरकिंग्ज’!; ‘आयपीएल’ साखळी सामन्यात 63 धावांनी एकतर्फी विजय
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी, सुर्या दुस-या सामन्यातूनही बाहेर

Latest Marathi News शुभमन गिलला झटका; स्लो ओव्हर रेटसाठी ठोठावला दंड Brought to You By : Bharat Live News Media.