नाशिक : येवला शहरात जनावरांची अवैध वाहतूक; टेम्पो चालक पोलीसांच्या ताब्यात

नाशिक : येवला शहरात जनावरांची अवैध वाहतूक; टेम्पो चालक पोलीसांच्या ताब्यात

येवला; Bharat Live News Media वृत्तसेवा : येवला कोपरगांव रोडवर अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करण्यात आली. या टेम्पोमध्ये ८ वासरु आणि एक गाय आढळून आली. येवला शहर पोलिसांनी ही कारवाई करुन चालकासह टेम्पो जप्त करत कारवाई केली.
मोरनी पैठणी समोर नांदेसर रेल्वे गेट जवळ पोलिसांना एका पिकअपमध्ये (क्र. एमएच १५ डी के ४६२९) अवैधरित्या जनावरांची वाहतुक करत असल्याचे आढळून आले. या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात ८ वासरू, एक गाय असे मिळून आले. या टेम्पोचे चालक मुंतजीर रौफ कुरेशी (वय २६ रा संजयनगर, ता कोपरगांव, जि अहमदनगर) याची विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याबाबत अधिक चौकशी केली असता ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याची खात्री पोलिसांना झाली. या टेम्पोतील सर्व जनावरांची सुटका करुन, पिकअपसह व आरोपी कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती,  उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शना खाली व पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोउनि डी एम लोखंडे, पोउनि सी बी पाटील, पोना हेंबाडे, पोना गेटे, पोशि दळवी, पोशि बी पवार, पोशि जी पवार, यांनी ही कारवाई केली.
Latest Marathi News नाशिक : येवला शहरात जनावरांची अवैध वाहतूक; टेम्पो चालक पोलीसांच्या ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.