महादेव जानकरांकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत; महायुतीकडून अद्याप घोषणा नाही

महादेव जानकरांकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत; महायुतीकडून अद्याप घोषणा नाही

परभणी, Bharat Live News Media वृत्तसेवा : दोनच दिवसांपूर्वी महायुतीशी नाते जोडलेल्या रासपचे नेते महादेव जानकरांनी आपण परभणीतूनच लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र, महायुतीकडून अद्यापतरी अधिकृतरित्या त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या उमेदवारीने जिल्ह्याच्या विशेषतः महायुतीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजपकडून इच्छूक उमेदवारांचा मोठा हिरमोड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जानकर यांच्या उमेदवारीवर माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी बाहेरचा उमेदवार लादू नये, अशी आग्रही मागणी करताना भाजपलाच हा मतदारसंघ देण्यात यावा, अशी मागणीही केली आहे. (Loksabha Election 2024)
परभणी लोकसभा मतदारसंघातील जातीय समिकरणे लक्षात घेवून 15 दिवसांपूर्वीच रासपचे नेते महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेतून आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी महाविकास आघाडी व महायुतीशीही आपली बोलणी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. महाविकास आघाडीकडूनही परभणी सोडवून घेवू, असे त्यांनी म्हटले होते. मात्र महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे विद्यमान खा.संजय जाधव हे असल्याने महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाचा या ठिकाणी विचारही होवू शकत नाही, असे स्पष्ट झाले होते. साहजिकच पूर्वीपासून महायुती व त्यातही भाजपशी जवळीक असलेले मात्र मध्यंतरीच्या काळात भाजपपासून दूर केलेल्या जानकरांनी महायुतीशीच जवळीक साधणे सोईचे ठरेल. हे लक्षात घेवून दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीत जाण्याचे निश्‍चीत करताना रासपसाठी एक मतदारसंघ त्यातही परभणी वा माढा सोडण्याची आग्रही मागणी केली. मात्र भाजपने माढ्यामध्ये यापूर्वीच उमेदवार जाहीर केलेला असल्याने व परभणीतील ओबीसी मतदारांमुळे आकृष्ट झालेले जानकर यांनी परभणीचाच विचार निश्‍चीत केला. महायुतीनेही त्या दृष्टीने त्यांना जागा देण्याचे कबुल केले.
या पार्श्‍वभूमीवर परभणी रासपला सुटणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर मंगळवारी स्वतः जानकर यांनी आपल्या फेसबुक वॉलवरून आपली उमेदवारी परभणीसाठी जाहीर केली. जानकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते कै.गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञाताई यांचा आर्शिवाद घेत आपण परभणीकडे प्रचारासाठी रवाना होत असल्याची पोस्ट केल्याने त्यांची परभणीसाठीची उमेदवारी निश्‍चीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. वास्तविक महायुतीकडून तसेच स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीतील इच्छूक उमेदवारांच्या आशा अजुनही धुसर झालेल्या नाहीत. मात्र अस्वस्थता वाढली आहे. (Loksabha Election 2024)
महायुतीत अस्वस्थता
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांनी आपली उमेदवारी निश्‍चीत होईल, या आशेने गेल्या सहा महिन्यांपासून मोठी तयारी चालविली आहे. अलीकडील काळात त्यांनी सर्वच विधानसभा मतदारसंघातील आपला संपर्क वाढविलेला आहे. प्रचाराची यंत्रणा देखील लावण्याचे नियोजन केलेले आहे. मागील निवडणूकीत 42 हजार मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागल्याने यावेळी कोणतीही जोखीम स्विकारण्याची तयारी न दाखवता त्यांनी महायुतीतील सर्व नेतेमंडळींशीही जुळवून घेतलेले आहे. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनीही भाजपच्या सर्व नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेवून आपल्या उमेदवारीसाठी साकडे घातलेले आहे. राजकारणाचा प्रदिर्घ अनुभव असलेले बोर्डीकर यावेळी लोकसभेच्या रिंगणात सर्व ताकदिनिशी उतरण्यास सज्ज असताना महायुतीने रासपसाठी हा मतदारसंघ सोडण्याच्या निर्णयामुळे या दोघांसह महायुतीतील सर्वच पक्षांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.
हेही वाचा :

Sonam Wangchuk Fast Over : ‘लडाखसाठी लढा सुरूच राहणार’, सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे
Nashik Crime News | ‘मनी लॉन्ड्रिंग’त सहभागी असल्याचे धमकावत सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यास ४५ लाखांचा गंडा 
Akanksha Puri : गुलाल हो…तो लाल हो; आकांक्षा पुरीने शेअर केले टॉपलेस फोटो

Latest Marathi News महादेव जानकरांकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत; महायुतीकडून अद्याप घोषणा नाही Brought to You By : Bharat Live News Media.