एसटी बस- तवेराचा भीषण अपघात, दोघे ठार

एसटी बस- तवेराचा भीषण अपघात, दोघे ठार

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा– मालेगाव डेपोची बस चाळीसगाव- मालेगाव कडे जात असताना मालेगाव वरून चाळीसगाव कडे येणाऱ्या तवेरा गाडीचा व बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना चाळीसगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव डेपोची बस क्रमांक (एम एच 14 बीटी 0375) ही दुपारी चाळीसगाव वरून मालेगाव कडे जात असताना तवेरा क्रमांक (एम एच 04 सिटी 24 92) ही मालेगाव कडून चाळीसगाव कडे येत असताना देवडी जवळ बसणे ओव्हरटेक करताना तवेराला दिलेल्या ठोस मध्ये दोन जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मेहुनबारेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :

Kangana Ranaut : ‘संयम ठेवा…’ कंगना राणावत जे. पी. नड्डा यांच्या भेटीला
Vishwajit Patil: भाजप ऐनवेळी सांगलीत विशाल पाटलांना उमेदवारी देणार?, विश्वजित कदम म्हणाले…
Spruha Joshi : ‘मी नॉनव्हेज खव्वयी’, ब्राह्मण असूनही का करते मांसाहार?

Latest Marathi News एसटी बस- तवेराचा भीषण अपघात, दोघे ठार Brought to You By : Bharat Live News Media.