बच्चन परिवाराचा होळी उत्सव, नव्या नंदाने सुंदर फोटो केले शेअर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बच्चन परिवाराने होळीचा दिवस मोठ्या धामधुमीत साजरा केला. होळीचा सण संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला. बच्चन परिवाराने देखील होळीचे दहन केलं. ( Bachchan Family Holi) या उत्सवाचे फोटो नव्या नंदाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये नव्या नवेली व्हाईट सूटमध्ये होळीच्या समोर उभी असलेली दिसते. दुसऱ्या फोटोत नव्या अभिषेक कुमारला गुलाल लावताना दिसली. ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या बच्चन आणि श्वेता बच्चनची झलक पाहायला मिळाली. ( Bachchan Family Holi)
तिसऱ्या फोटोमध्ये अभिषेक होळीसमोर बसलेला दिसतो. तो होळीकडे पाहताना दिसतो. आणखी एका फोटोमध्ये जया बच्चन होळीजवळ दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये अमिताभ बच्चन दिसत नाही. तर एका फोटोमध्ये ऐश्वर्या रायची झलक दिसते.
रिपोर्टनुसार, रविवारी सायंकाळी अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणे आपल्या फॅन्सना भेटण्यासाठी घराबाहेर आले होते.
View this post on Instagram
A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)
Latest Marathi News बच्चन परिवाराचा होळी उत्सव, नव्या नंदाने सुंदर फोटो केले शेअर Brought to You By : Bharat Live News Media.