पिंपरी : बसेसमधील सुविधा दिखाव्यापुरत्याच !

पिंपरी : बसेसमधील सुविधा दिखाव्यापुरत्याच !

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक तसेच सीएनजी बसगाड्यांमध्ये विनंती थांबा बटण, पॅनिक बटण तसेच चार्जिंग पॉईंट बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असू, प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पीएमपीएलचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील अनेक नोकरदार कामानिमित्त पुणे शहरात ये-जा करत असतात. त्याप्रमाणे पीएमआरडीएच्या हद्दीतदेखील पीएमपीकडून सेवा देण्यात येते. या सेवेला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, दिवसाला सरासरी 11 लाख प्रवासी पीएमपीच्या बसेसमधून प्रवास करतात. प्रवासात गैरसोय होवू नये म्हणून काही उपकरणे बसेसमध्ये बसविलेली असतात.
त्यामध्ये विनंती थांबा बटण, पॅनिक बटण असते; तसेच सध्या अनेकजण मोबाईलचा वापर करतात. मोबाईल चार्जिंग करण्यासाठीदेखील बसमध्ये चार्जिंग पाँईट असतो; परंतु सध्या अनेक बसगाड्यांमध्ये हे चार्जिंग पॉईंट नावापुरताच असल्याचे दिसून येते. याविषयी संबंधित वाहकांना विचारले असता, प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे मिळतात. बस ट्रॅकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअरच कार्यान्वित नसल्याने या यंत्रणेवर केलेला लाखोंचा खर्च बिनकामी ठरत आहे. पीएमपी गाड्यात मोठी गर्दी असते. गर्दीत एखाद्या प्रवाशाने दहा रूपयांचे तिकीट मागितल्यास, प्रवाशांनाच दहा रूपयांसाठी कशाला युपीआय पेमेंट करायचे, दहा रूपयाची नोट देण्याविषयी सांगितले जाते.
पॅनिक बटन कशासाठी ?
बसने प्रवास करणार्‍यांमध्ये महिलांची संख्याही मोठी असते. काही वेळा पीएमपीच्या गाड्यांमध्ये गर्दी असते. गर्दींमुळे काही महिलांना असुरक्षित वाटल्यास बसमध्ये पॅनिक बटनची सुविधा असते. हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असून, हे बटन दाबल्यानंतर सायरनचे काम करते. हा सायरन नियंत्रण कक्षापर्यंत जातो; मात्र पीएमपीच्या अनेक गाड्यांमधील हे बटन कार्यरत नसल्याचे दिसून आले.
ऑनलाइन पेमेंटही त्रासाचे बसमधून प्रवास करणार्‍यांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. मात्र अनेकवेळा यूपीआय पेमेंट किंवा नेटवर्कच्या समस्या निर्माण होत असल्याने प्रवाशांना कॅशलेस सुविधा मिळत नाही. तसेच प्रवासादरम्यान युपीआयद्रारे पेमेंट होत नसल्याने प्रवासी व वाहकांत शाब्दिक बाचाबाची होते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
सुटे पैसे नाही तर खाली उतरा…!
निगडी बस स्टॉप येथून एक तरुण तळेगावला जाण्यासाठी बसमध्ये बसला. त्याने वाहकाकडे तिकीट मागितल्यानंतर नेटवर्क अडचण असून, युपीआयद्रारे तिकीट मिळणार नसल्याचे सांगितले; मात्र प्रवाशाकडेही सुटे पैसे नव्हते. त्यामुळे पुढील बसथांब्यावर त्या प्रवाशाला वाहकाने बसमधून उतरण्यास सांगितले.
ऑनलाइन पेमेंटही त्रासाचे
बसमधून प्रवास करणार्‍यांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. मात्र अनेकवेळा यूपीआय पेमेंट किंवा नेटवर्कच्या समस्या निर्माण होत असल्याने प्रवाशांना कॅशलेस सुविधा मिळत नाही. तसेच प्रवासादरम्यान युपीआयद्रारे पेमेंट होत नसल्याने प्रवासी व वाहकांत शाब्दिक बाचाबाची होते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.
पीएमपीने प्रवास करताना प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यादरम्यान गर्दीमधून काहीवेऴा पॅनिक बटनास प्रवाशाचा हात लागतो किंवा चुकून स्पर्श झाल्यास बस थांबावावी लागते; तसेच काही प्रवासी कशासाठी उपयोग होतो, हे बघण्यासाठी हे बटन दाबतात. त्यामुळे वाहकास वारंवार बस थांबवावी लागते.
– यशवंत हिंगे, निगडी आगार प्रमुख.

हेही वाचा

पिंपरी : सायबर गुन्ह्याचे बँकॉक कनेक्शन : सायबर सेलकडून चौघांना अटक
कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा खून
अकोला : तापमानाने गाठला  40 डिग्री सेल्सिअस चा आकडा  

Latest Marathi News पिंपरी : बसेसमधील सुविधा दिखाव्यापुरत्याच ! Brought to You By : Bharat Live News Media.