भाजप ऐनवेळी सांगलीत विशाल पाटलांना उमेदवारी देणार?, विश्वजित कदम म्हणाले…
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री विश्वजित कदम काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. आता यावरून महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत आमदार पाटील यांनी ‘Bharat Live News Media न्यूज’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत खुलासा केला आहे. Vishwajit Patil
पाटील म्हणाले की, सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा परंपरेने काँग्रेस आतापर्यंत लढवत आली आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली म्हणून सांगलीची जागा सेनेला सोडण्यात यावी, हे आम्हाला अमान्य आहे. शिवसेना ठाकरे गटाने आघाडी धर्माचे पालन केलेले नाही. परस्पर उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी संयुक्त बैठकीत उमेदवारांची यादी जाहीर केली पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त करून ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली. Vishwajit Patil
Vishwajit Patil : काहीही झाले तरी सांगलीचा हट्ट सोडणार नाही
कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे होती. परंतु, छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीतील ज्या पक्षातून लढण्यासाठी इच्छुक असतील, त्या पक्षातून त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतला होता. शाहू महाराज यांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा दर्शवल्याने आणि त्यांच्या मताचा सन्मान राखून त्यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीचा कोल्हापूरच्या जागेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही.
भाजपकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याची चर्चा
भाजपने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, ती उमेदवारी गाफील ठेवण्यासाठी जाहीर केली आहे. ऐनवेळी भाजप विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करेल, अशी चर्चा आहे. यावर आमदार कदम म्हणाले की, जाहीर केलेली उमेदवारी माघारी घेणे, आणि उमेदवार आयात करून उमेदवारी देण्याची भाजपची पद्धत असेल, तर यावर भाजप आणि दोन वेळा खासदार राहिलेले संजय पाटीलच उत्तर देतील, असे कदम म्हणाले.
विशाल पाटील यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे, त्यांचे दौरे होत आहेत. मी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असा मॅसेज जिल्ह्यात आणि मतदारसंघात गेला आहे. त्यामुळे मी एकदा शब्द दिला की, तो पाळण्यासाठी कटिबद्ध असतो. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी मी आग्रही आहे. याबद्दल मी राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांचा वाईटपणा घेतला असेल. नाराजी ओढावून घेतली आहे. परंतु माझा सांगलीच्या जागेसाठी हट्ट कायम आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
सांगली : चंद्रहार की विशाल? उत्सुकता शिगेला
Sangli MD drugs Seized : सांगलीत मोठी कारवाई : इरळी येथून २४५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; ६ जणांना अटक
काहीही झाले तरी सांगली लोकसभा मतदारसंघावरील हक्क सोडणार नाही : विश्वजित कदम
Latest Marathi News भाजप ऐनवेळी सांगलीत विशाल पाटलांना उमेदवारी देणार?, विश्वजित कदम म्हणाले… Brought to You By : Bharat Live News Media.