‘मी नॉनव्हेज खव्वयी’, ब्राह्मण असूनही स्पृहा जोशी का करते मांसाहार?

‘मी नॉनव्हेज खव्वयी’, ब्राह्मण असूनही स्पृहा जोशी का करते मांसाहार?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) मांसाहारामुळे अनेकवेळा ट्रोल झालीय. ती एक उत्तम अभिनेत्री, कवयित्री आणि लेखिकादेखील आहे. ती आपले अपडेट्स सोशल मीडियावर देत असते. पण, काही दिवसांपूर्वी स्पृहा जोशीने तिच्या नॉनव्हेज खाण्यावरून ट्रोल केले होते. ब्राह्मण असूनही ती मांसाहार करत असल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागले. तिला अनेकदा ट्रोलिंग व्हावे लागले. आता एका मुलाखतीत तिने मांसाहारावर भाष्य केले. (Spruha Joshi)
स्पृहा म्हणाली की, मी मांसाहार करते. मी, आई आणि बहिण नॉनव्हेज प्रेमी आहोत. लग्नाआधी कधीही स्पृहाने स्वयंपाक घरात पाऊल ठेवले नाही. पण, लग्नानंतर तिला तिच्या आजीने लिहिलेली रेसिपीची वही सापडली. स्पृहा म्हणाली, माझ्या घरी सगळे नॉनव्हेज प्रेमी आहेत. मात्र माझे बाबा शाकाहारी आहेत. माझे बाबा बॅडमिंटन प्लेयर आहेत. बहिण नॅशनल लेव्हलची जिम्नॅस्टिक प्लेयर आणि मी स्वत: खेळात होतो. खेळाडूंना नॉनव्हेज हे डाएट असतचं. म्हणून आमच्या घरात नॉनव्हेज खवय्ये आहेत. माझ्या आईकडून नॉनव्हेजची आवड आमच्याकडे पास झाली. शिवाय बाबादेखील वेगवेगळ्या ठिकाणी नॉनव्हेज खायला घेऊन जायचे, असे तिने सांगितले.
याआधीही मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये स्पृहा खेकड्यावर ताव मारताना दिसली होती. अभिनेता विनोद गायकर यावेळी सोबत होता. या व्हिडिओतून स्पृहाने ‘खेकडा कसा खायचा, खेकडा खाताना फॅन्सी वागू नये…तो हातानेच खायला पाहिजे’, असे म्‍हटले होते. त्यावेळच्या मुलाखतीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. स्पृहाने श्रावण महिन्यात मांसाहार केल्याने नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले होते.
Latest Marathi News ‘मी नॉनव्हेज खव्वयी’, ब्राह्मण असूनही स्पृहा जोशी का करते मांसाहार? Brought to You By : Bharat Live News Media.