जहाजाची धडक बसल्याने अमेरिकेच्या बाल्टिमोरमधील पूल कोसळला, मोठ्या जीवितहानीची भीती

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट पूल मालवाहू जहाजाची धडक बसल्याने कोसळला आहे. याबाबतचे वृत्त बीएनओ न्यूजने दिले आहे. बाल्टिमोर सिटी फायर डिपार्टमेंटचे कम्युनिकेशन डायरेक्टर चीफ केविन कार्टराईट यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. पुलाला मोठ्या जहाजाने धडक दिली, ज्यामुळे तो पटापस्को नदीत कोसळला. या दुर्घटनेत अनेक व्यक्ती आणि वाहने नदीत कोसळली … The post जहाजाची धडक बसल्याने अमेरिकेच्या बाल्टिमोरमधील पूल कोसळला, मोठ्या जीवितहानीची भीती appeared first on पुढारी.

जहाजाची धडक बसल्याने अमेरिकेच्या बाल्टिमोरमधील पूल कोसळला, मोठ्या जीवितहानीची भीती

Bharat Live News Media ऑनलाईन : अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट पूल मालवाहू जहाजाची धडक बसल्याने कोसळला आहे. याबाबतचे वृत्त बीएनओ न्यूजने दिले आहे. बाल्टिमोर सिटी फायर डिपार्टमेंटचे कम्युनिकेशन डायरेक्टर चीफ केविन कार्टराईट यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. पुलाला मोठ्या जहाजाने धडक दिली, ज्यामुळे तो पटापस्को नदीत कोसळला. या दुर्घटनेत अनेक व्यक्ती आणि वाहने नदीत कोसळली आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले असून त्यात हा पूल पत्त्याप्रमाणे कोसळताना दिसत आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, मेरीलँड वाहतूक प्राधिकरणाने पुष्टी केली की अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातील फ्रान्सिस स्कॉट पुलावरील घटनेमुळे दोन्ही दिशांनी सर्व वाहूतक बंद करण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १:३० वाजता (०५:३० GMT) ९११ कॉलवरून फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज परिसरातील दुर्घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती.

Francis Scott Key bridge in US’ Baltimore collapses after a ship collides with it, reports BNO News.
Details awaited.
— ANI (@ANI) March 26, 2024

At least 10 people missing since Singaporean ship struck Baltimore bridge pic.twitter.com/EjrMucf2kd https://t.co/7N17wTNw3Y
— FearBuck (@FearedBuck) March 26, 2024

Latest Marathi News जहाजाची धडक बसल्याने अमेरिकेच्या बाल्टिमोरमधील पूल कोसळला, मोठ्या जीवितहानीची भीती Brought to You By : Bharat Live News Media.