DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांचे तामिळनाडूत जोरदार शक्तीप्रदर्शन

DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांचे तामिळनाडूत जोरदार शक्तीप्रदर्शन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: देशभरात लोकसभा रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. अनेक पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान अनेक नेत्यांकडून शक्तीप्रदर्शन करत, पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. तामिळनाडूमध्येसुद्धा हे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी सत्ताधारी DMK (द्रविड मुन्नेत्र कळघम्) पक्षाचे नेते क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी आज (दि.२६) जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. (Lok Sabha Election Tamil Nadu)
मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर तामिळनाडूमधील तिरुवनमलाई जिल्ह्यात प्रचाराला सुरूवात केली. यावेळी स्टॅलिन यांनी तामिळनाडूतील जनतेला भावनिक आव्हान केले आहे. ते म्हणाले, ३ जून रोजी तामिळनाडूचे दिवंगत राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांची 100 वी जयंती आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे. त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील सर्व ४० जागा जिंकून आपण डीएमकेला भेट द्यायला हवी” असे आवाहन DMK नेते उदयनिधी यांनी जनतेला केले आहे. (Lok Sabha Election Tamil Nadu)

“June 3 marks the 100th birth anniversary of (late politician and former chief minister) M Karunanidhi and June 4 is Lok Sabha elections counting. We should give a gift by winning all the 40 seats in Tamil Nadu and Puducherry,” says DMK leader Udhayanidhi Stalin.. https://t.co/S0wUv25UK4
— ANI (@ANI) March 26, 2024

उदयनिधी हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच सुपुत्र आहेत. तसेच तमिळ सिनेसृष्टीत अभिनेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. मध्यंतरी ते सनातन धर्म आणि भाजपवर केलेल्या  वादग्रस्त टीपण्णीमुळे चर्चेत आले होते. (Lok Sabha Election Tamil Nadu)

#Vote4Dmk #Vote4RisingSun #Vote4INDIA #Election2024 @evvelu @thamoanbarasan @ksundarmla @EzhilarasanCvmp #Dharanivendhan @CNAnnaduraiMP @gselvam_mp pic.twitter.com/dsfQQva0vQ
— Udhay (@Udhaystalin) March 25, 2024

हेही  वाचा:

Lok Sabha polls 2024 : ठरलं..! पंजाबमध्‍ये भाजप स्‍वबळावर लढणार, अकाली दलाशी युती नाहीच
Lok Sabha Election 2024 | दादा-बापू-पवार संघर्षाच्या झळा तिसर्‍या पिढीतही!
Lok Sabha Election 2024 | लडाखी अस्मितेचा मुद्दा चर्चेत

Latest Marathi News DMK नेते उदयनिधी स्टॅलिन यांचे तामिळनाडूत जोरदार शक्तीप्रदर्शन Brought to You By : Bharat Live News Media.