आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष : रोजगाराच्या संधी मिळाल्‍याने तरुणांचा आत्मविश्वास वाढेल आज अनुभवी व्यक्तीचे सहकार्य मिळाल्‍याने तुमच्या मनातील संघर्ष संपुष्टात येईल. …

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : रोजगाराच्या संधी मिळाल्‍याने तरुणांचा आत्मविश्वास वाढेल
आज अनुभवी व्यक्तीचे सहकार्य मिळाल्‍याने तुमच्या मनातील संघर्ष संपुष्टात येईल. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत शांतता आणि संयम राखा. कोणतेही काम घाईघाईने आणि निष्काळजीपणे करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. व्यावसायिक कामात काळजी घ्यावी लागेल, अशी सूचना श्रीगणेश करतात. आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍या. रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्‍याने तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांनी त्‍याचे ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे.
वृषभ : युवकांनी आपल्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रीत करावे
श्रीगणेश सांगतात की, आज काही वेळ मनोरंजनासाठी व्‍यतित केल्‍यास मानसिक आणि शारीरिक ऊर्जा टिकून राहण्‍यास मदत होईल. दीर्घकालीन नियोजन करतान आर्थिक अडचणी येण्‍याची शक्‍यता आहे; पण यावर उपायही सापडेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. युवकांनी आपल्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रीत करावे. व्यवसायात उत्पादन क्षमता वाढेल. परिस्थिती तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. वरिष्ठांशी वाद घालू नका.
मिथुन : व्यावसायिक कामाला गती देण्यासाठी विचार करा
श्रीगणेश म्‍हणतात की, आज मित्रांचा सल्‍ला तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरेल. केवळ तुमच्‍या कामाकडे लक्ष द्‍या. निरुपयोगी कामांमध्ये सहभागी होवू नका. कोणत्याही प्रकारचे अयोग्य काम तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा अनुभव तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यावसायिक कामाला गती देण्यासाठी अतिशय गांभीर्याने विचार करा. जनसंपर्काची व्याप्ती वाढवल्यास कार्यक्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करा
मागील काही काळापासून सुरू असलेले कौटुंबिक वाद मिटल्याने कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य द्या. अतिउत्साहाने केलेले कामही बिघडू शकते. संयमाने काम करा, अशी सूचना श्रीगणेश करतात.
सिंह : आज कोणतेही नवीन कामाची सुरुवात करु नका
श्रीगणेश सांगतात की, ग्रहांचे संक्रमण तुमची कार्यक्षमता वाढवत आहे. जवळच्या लोकांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. प्रवासाचे नियोजन कराल. अहंकारामुळे नुकसान होवू शकते. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात सध्याची परिस्‍थिती कायम राहिल. आज कोणतेही नवीन कामाची सुरुवात करु नका. जोडीदाराचा सल्ला महत्त्‍वपूर्ण ठरेल.
कन्या : संतुलित वागणुकीमुळे योग्य सामंजस्य राहील
संतुलित वागणुकीमुळे योग्य सामंजस्य राहील. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कामांना गती येईल. रागवण्याऐवजी एखाद्याची चूक समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीची चिंता राहील. व्‍यवसायात तुमच्‍या नियोजनाचे गांभीर्याने मूल्यांकन करा.
तूळ : योग आणि ध्यानाचा अवलंब फायदेशीर ठरेल.
नवीन उपक्रमांमध्ये तुमची आवड वाढेल. मुलाकडून चांगली बातमी मिळाल्‍याने दिलासा मिळेल. आळशीपणा टाळा. तुमच्या कामावर अधिक लक्ष द्या. योग आणि ध्यानाचा अवलंब फायदेशीर ठरेल. व्यवसायाच्या ठिकाणी आपले सहकारी आणि कर्मचारी यांच्याशी चांगले संबंध ठेवा. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करा, अशी सूचना श्रीगणेश करतात.
वृश्चिक : ग्रहांची स्थिती सकारात्मक राहील
ग्रहांची स्थिती सकारात्मक राहील. महिलांसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. तुमच्या स्वभावात परिपक्वता आणा. लहानसहान गोष्टींवरून होणारी चिडचिड घरात वातावरण दूषित करू शकते. अनावश्यक वाढत्या खर्चामुळे शांततेसह झोपेवरही परिणाम होईल. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळेल.
धनु : व्यवसायात तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल
तुमच्या योग्य कार्यशैलीमुळे समाजात ओळख निर्माण होईल. कठोर परिश्रम सकारात्मक परिणाम देईल. थकित पैसे परत मिळण्‍याची आशा आहे. इतरांच्या वैयक्तिक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. गैरसमजामुळे जवळच्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतो. मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे देखील आवश्यक आहे. व्यवसायात तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल. बेकायदेशीर कामात रस घेतल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.
मकर :  सकारात्मक वातावरणामुळे परिस्थिती अनुकूल होईल
तुम्ही केलेल्या नियमांमुळे घरात शिस्तबद्ध वातावरण राहील. सकारात्मक वातावरणामुळे परिस्थिती अनुकूल होईल. कोणत्याही नकारात्मक कृतीमुळे मुले चिंताग्रस्त होऊ शकतात. पण तुमच्या समजुतीमुळे त्यांच्या वागण्यात सकारात्मक बदल घडून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कामाचा ताण जास्त असेल. ऑफिसमधील लोकांनी संयम बाळगावा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.
कुंभ : खास व्यक्तींसोबतची भेट फायदेशीर ठरेल
आज मागील काही काळापासून रखडलेली कामे सहज मार्गी लागतील, असे श्रीगणेश सांगतात. घाई न करता शांततेने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करा. खास व्यक्तींसोबतची भेट फायदेशीर ठरेल. अतिआत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते. घरातील ज्‍येष्‍ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. नवीन व्यावसायिक करार होतील. व्यावसायिक कामांशी संबंधित कर्ज घेताना पुन्हा एकदा विचार करणे आवश्यक आहे.
मीन : आर्थिक स्थिती चांगली राहील
श्रीगणेश म्‍हणतात की, संपर्कांद्वारे प्राप्‍त होणारी विशेष माहिती फायदेशीर सिद्ध होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. परदेशात जाणाऱ्या मुलांबाबतही कारवाई सुरू केली जाईल. वादापासून स्वतःला दूर ठेवा. विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील; पण काळजी करू नका, तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही. तुमचा आक्रमक स्वभाव तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. व्यवसायातील रखडलेल्या कामात गती येईल.