गोवा: बाबा लगीन…म्हणत मुलाकडून पित्याची हत्या
फोंडा (गोवा) पुढारी वृत्तसेवा: लग्न जुळवत नसल्याच्या वादातून मुलाकडून झालेल्या मारहाणीत वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना तळपणवाडा – शिरोडा येथे बुधवारी (दि. 2) दुपारी घडली.
तळपणवाडा येथील राजेश गणेश गावकर (वय 34) याने वडील गणेश राघोबा गावकर (65) यांच्याशी लग्न का जुळवत नाही म्हणून भांडण उकरून काढले. या भांडणाचे पर्यावसान मारहाणीत होऊन राजेश याने जवळ असलेली लोखंडी पहार वडिलांच्या डोक्यात घातली. एवढ्याने समाधान न झालेल्या गणेशने टाईल्सचा तुकडा वडिलांच्या डोक्यावर मारला.
केंद्र सरकारला नविनचे पार्थिव आणण्यात अडचणी, वडिलांचा आक्रोश https://t.co/fd6PjhLf77नवीन-शेखरप्पा-कर्नाटकचा-विद्यार्थी-नवीनचे-पार्थिव-आणण्यात-अडचणी/ar #pudharinews #pudharionline #UkraineRussiaWar
— Pudhari (@pudharionline) March 3, 2022
यामध्ये गणेश गावकर रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. त्यांना सुरुवातीला मडगाव हॉस्पिसियो इस्पितळ व नंतर बांबोळी इस्पितळात अधिक उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना गणेश यांचे सायंकाळी निधन झाले.
भगिनींनो, आरोग्याची हेळसांड थांबवा!
फोंडा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहे. याप्रकरणी मयत गणेश गावकर यांची मुलगी शर्मिला गावकर यांनी पोलिसांत तक्रार दिली.
हेही वाचा
नाशिक : रामकुंडावरील वस्त्रांतरगृहावर हातोडा पडणार ; प्रशासन-पुरोहितांमध्ये वादाची चिन्हे
russia-ukraine war: तिसरे महायुद्ध झाल्यास अण्वस्ञांचा वापर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव्ह यांची धमकी
डोकेदुखी नेमकी कशामुळे होते? जाणून घ्या अधिक
The post गोवा: बाबा लगीन…म्हणत मुलाकडून पित्याची हत्या appeared first on पुढारी.
फोंडा (गोवा) पुढारी वृत्तसेवा: लग्न जुळवत नसल्याच्या वादातून मुलाकडून झालेल्या मारहाणीत वडिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना तळपणवाडा – शिरोडा येथे बुधवारी (दि. 2) दुपारी घडली. तळपणवाडा येथील राजेश गणेश गावकर (वय 34) याने वडील गणेश राघोबा गावकर (65) यांच्याशी लग्न का जुळवत नाही म्हणून भांडण उकरून काढले. या भांडणाचे पर्यावसान मारहाणीत होऊन राजेश याने …
The post गोवा: बाबा लगीन…म्हणत मुलाकडून पित्याची हत्या appeared first on पुढारी.