तासगावात कुर्‍हाडीने नाक तोडले

तासगावात कुर्‍हाडीने नाक तोडले

तासगाव (सांगली) पुढारी वृत्तसेवा: येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील सुरेश श्रीमंत जाधव (वय 32) याने न्यायालयात विरोधात साक्ष दिली म्हणून त्याच्यावर त्याचा मेहुणा लल्या उर्फ सूरज दिनकर शिंदे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी) याने कुर्‍हाडीने हल्ला करून जखमी केले. हल्ल्यात सुरेश याचे नाक तुटले आहे.
या प्रकरणी जखमी सुरेश याने लल्या उर्फ सूरज याच्या विरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित लल्या याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

युक्रेन सीमेवर हजारो मुलांची आईवडिलांपासून ताटातूट; आक्रोश आणि हुंदका थांबेना (photos) https://t.co/KwpHAO1uju
— Pudhari (@pudharionline) March 1, 2022

पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी सुरेश याने लल्याच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. यावरून संशयित लल्या हा सुरेश याच्यावर चिडून होता. तो दि. 26 फेब्रुवारी रोजी सुरेश याला मारण्याचा उद्देशाने सुरेश त्याच्या घरासमोर गेला होता. याची माहिती त्या ठिकाणी असणार्‍या काही जणांना मिळाली होती.

सांगलीत केबल वॉर पुन्हा भडकले

त्यांनी ही माहिती फोनवरून सुरेश याला सांगितली.“तू घराकडे येऊ नकोस. तुला लल्या मारायला आला आहे”. तरीही सुरेश हा त्याठिकाणी आला. संशयित लल्या याने कुर्‍हाडीने सुरेश याच्यावर हल्ला केला. नाकावर कुर्‍हाडीचा घाव बसल्याने सुरेश याचे नाक तुटले आहे असे त्याने फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा 

सांगली : ऐतवडे बुद्रुकमध्ये सिलिंडरचा स्फोट
सांगली : खा. संजय पाटील यांनी राजीनामा द्यावा
सिंधुदुर्ग : दोडामार्ग नगरपंचायत उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यावरून वादंग

 
The post तासगावात कुर्‍हाडीने नाक तोडले appeared first on पुढारी.

तासगाव (सांगली) पुढारी वृत्तसेवा: येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील सुरेश श्रीमंत जाधव (वय 32) याने न्यायालयात विरोधात साक्ष दिली म्हणून त्याच्यावर त्याचा मेहुणा लल्या उर्फ सूरज दिनकर शिंदे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी) याने कुर्‍हाडीने हल्ला करून जखमी केले. हल्ल्यात सुरेश याचे नाक तुटले आहे. या प्रकरणी जखमी सुरेश याने लल्या उर्फ सूरज याच्या विरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल …

The post तासगावात कुर्‍हाडीने नाक तोडले appeared first on पुढारी.

Go to Source