रात्रीची झोप उडालीय, आई झाल्यानंतर डिप्रेशनच्या अवस्थेत इलियाना
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुलाला जन्म दिल्यानंतर इलियाना डिक्रुझ मातृत्वाचा आनंद घेत आहे. पण, तिच्या एका पोस्टमुळे तिची चर्चा होतेय. (Ileana D’Cruz) १ ऑगस्ट, २०२३ रोजी मुलाला जन्म दिल्यानंतर आता तिने पोस्टच्या माध्यमातून अशा काही गोष्टी शेअर केल्या आहेत, ज्यामुळे तिच्या फॅन्सना चिंता होऊ लागली आहे. तिने आपल्या पोस्टमार्टम डिप्रेशन (postpartum depression) विषयी काही खुलासे केले आहेत आणि तिने सांगतले की, तिचे जीवन कशाप्रकारे बदलले. (Ileana D’Cruz)
इलियाना डिक्रूजने आपल्या इन्स्टाग्रामवर एक तिने साधेपणाने भरलेला एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती खूपच उदास दिसत आहे. यामध्ये तिने एक लांबलचक पोस्ट लिहिलीय आणि सांगितले की, आई झाल्यानंतर तिच्या आयुष्यात काय काय बदल झाले आणि आता ती कशी आहे?
इलियानाने एक फोटो शेअर केला आहे, त्या कॅप्शनमध्ये लांबलचक पोस्ट लिहिलेली दिसते. तिने सांगितले की, स्वत:साठी वेळ मिळत नाही आणि तिचे आयुष्य कोणत्या परिस्थितीतून जात आहे. तिने लिहिलं, ‘Hi…तेव्हापासून मी माझा कोणताही फोटो घेतलेला नाही किंवा कोणतीही पोस्ट देखील केलेली नाही. खूप कालावधी झाला, एक आई होण्याच्या नात्याने आणि घर सांभाळणे या दोन्हींमध्ये मला स्वत:ला वेळ मिळत नाही.’
इलियाना पुढे लिहिते, ‘मला सेल्फीसाठी पाऊट बनवण्याची आयडिया आथा मला येत नाही. सत्य हे आहे की, काही दिवस खरोखरचं कठीण राहिले. झोप पूर्ण होत नाही. मी तक्रार करण्याचा प्रयत्न देखील करत नाही. कारण माझं प्रमेळ बाळ मला सर्वाधिक महत्त्वाचं आहे. पण आम्ही पोस्टपार्टम डिप्रेशनवर कधी उघडपणे बोलत नाही. हे सत्य आहे आणि एका प्रकारे एक वेगळा अनुभव देणारे आहे.’
या पोस्टमध्ये इलियानाने देखील सांगितले की, ती स्वत: या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी काय काय करते? ती रोज ३० मिनिटे एक्सरसाईज करते, ५ मिनिटे शॉवर घेते आणि त्यानंतर आपले डाएट परफेक्ट ठेवण्यासाठी योग्य आहार घेते.
View this post on Instagram
A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)
View this post on Instagram
A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)
Latest Marathi News रात्रीची झोप उडालीय, आई झाल्यानंतर डिप्रेशनच्या अवस्थेत इलियाना Brought to You By : Bharat Live News Media.