चांगली बातमी ! ग्रामीण भागातील युवक-युवतींना गावातच मिळणार स्वयंरोजगाराचे धडे

चांगली बातमी ! ग्रामीण भागातील युवक-युवतींना गावातच मिळणार स्वयंरोजगाराचे धडे

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यातील ग्रामीण भागात राहणा-या युवक युवतींना आता गावातच स्वयंरोजगाराचे धडे मिळणार आहेत. त्यासाठी राज्याच्या कौशल्य , रोजगार, उद्योजकता व नाविन्यता या विभागाने पुढाकार घेतला आहे. सद्य:स्थितीत राज्यातील 511 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील 112 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विकास केंद्राच्या माध्यमातून मोफत विविध प्रकारचे कोर्सेस राबविण्यात येणार आहेत. शिवाय गावातच ‘रोजगार’ सुरू करण्यासाठी देखील युवक युवतींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :

Uttarakhand Tunnel Crash | बोगद्यातील ४० मजुरांसाठी बचावकार्य युद्धपातळीवर, पाईपमधून अन्नाची पाकिटे, ऑक्सिजनचा पुरवठा
कोल्‍हापूर : शिरोळ तालुक्यात ऊसदर आंदोलन पेटले, अकिवाट येथे बैलगाड्या पेटवल्या
सांगली : ‘स्वाभिमानी’ आक्रमक; ऊस दर आंदोलन पेटण्याची चिन्हे

गावाकडील युवक अगर युवतींना शहरी भागात येऊन एखादा कोर्स करावयाचा असेल तर त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. एक तर परिस्थिती बेताची असते, त्यामुळे शहरात रूम करून राहणे, जेवणाचा खर्च तसेच कोर्ससाठी लागणारी लाखो रूपयांची फी देणे परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन गावाकडील युवक-युवतींसाठी त्यांच्या गावातच वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरू करून त्या माध्यमातून त्यांना मोफत प्रशिक्षण दिले तर त्यांना नक्कीच फायदा होईल शिवाय गावातच रोजगार निर्माण होण्यासाठी देखील मदत होईल. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्यावतीने स्थानिक पातळीवर (ग्रामपंचायतीच्या हद्दीत म्हणजेच गावातच ) कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र असे नामकरण करण्यात आले आहे.
या कौशल्य केंद्राच्या माध्यमातून गावातील युवक-युवतींसाठी त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे अल्प मुदतीचे कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अ‍ॅग्रीकल्चर, कन्स्ट्रकशन, टुरिझम अ‍ॅन्ड हॉस्पिटॅलिटी, फुड प्रोसेसिंग, कॅपिटल,गुडस, अ‍ॅपरल, मिडिया अ‍ॅन्ड एन्टरटेनमेंट, डोमेस्टिक वर्कर, पॉवर इलेक्ट्रानिक्स, ब्युटी अ‍ॅन्ड वेलनेस, आयटी आयटीइएस, यासह इतर विविध प्रकारच्या कोर्सेसचा समावेश करण्यात आलेला आहे. याबरोबरच स्थानिक पातळीवर मागणी असलेले विविध सेक्टरमधील कोर्स देखील राबविण्यात येणार आहेत. या वेगवेगळ्या प्रकारचे कोर्समुळे युवक- युवतींना स्थानिक पातळीवरच रोजगार /स्वयरोजगार उपलब्ध होण्यास मद्त होणार आहेच. शिवाय गावाजळ असलेल्या एम. आय. डी.सी. मधील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये देखील नोकरी मिळण्यास सहकार्य होणार आहे.
यामुळे ग्रामीण भागातील गावामध्ये राहणा-या युवक युवतींना शहराकडे जाण्याची गरज पडणार नाही. युवक युवतींना स्वंयरोजगाराचे धडे देण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून 511 ग्रामपंचायतीमध्ये विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर पुणे विभागातील पाच जिल्ह्यामध्ये 112 ग्रामपंचयतीमध्ये ही केंद्र स्थापन झाली आहेत. त्यामध्ये पुणे-30, सातारा-20, सांगली-17, सोलापूर-24 आणि कोल्हापूर – 25 या पाच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
 
The post चांगली बातमी ! ग्रामीण भागातील युवक-युवतींना गावातच मिळणार स्वयंरोजगाराचे धडे appeared first on पुढारी.

पुणे : राज्यातील ग्रामीण भागात राहणा-या युवक युवतींना आता गावातच स्वयंरोजगाराचे धडे मिळणार आहेत. त्यासाठी राज्याच्या कौशल्य , रोजगार, उद्योजकता व नाविन्यता या विभागाने पुढाकार घेतला आहे. सद्य:स्थितीत राज्यातील 511 ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील 112 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या विकास केंद्राच्या माध्यमातून मोफत …

The post चांगली बातमी ! ग्रामीण भागातील युवक-युवतींना गावातच मिळणार स्वयंरोजगाराचे धडे appeared first on पुढारी.

Go to Source