गाझातील ‘अल शिफा’ रूग्णालयानजीकच धुमश्चक्री

गाझातील ‘अल शिफा’ रूग्णालयानजीकच धुमश्चक्री


पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. गाझा शहरातील मुख्य रुग्णालयाजवळच हमास-इस्रायलमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे.  रूग्णालयांमधील वीजपुरवठा जवळपास पूर्णपणे खंडित झाला आहे. तसेच अन्न आणि पाण्याची देखील कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.  (Israel-Hamas war)
गाझा शहरावर इस्रायलकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. हमासकडून प्रत्त्युत्तर दिले जात आहे. या हल्ल्यांमुळे गाझातील ‘अल-शिफा’ आणि ‘अल-कुड्स’ या दोन्ही रूग्णालयातील परिस्थिती गंभीर झाली आहे. रूग्णालयाच्या आसपासच्या भागात सतत गोळीबार आणि स्फोटांची मालिकाच  सुरूआहे. रूग्णालयात मुलभूत सुविधा मिळत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दरम्यान, सुविधेअभावी येथील अनेक पॅलेस्टिनी नागरिक आणि बालकांचा मृत्यू देखील होत आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Israel-Hamas war)
Israel-Hamas war: वीजपुरवठा गायब, रुग्‍णांचे अताेनात हाल
दरम्यान अल-शिफाचे शस्त्रक्रिया प्रमुख डॉ. मारवान अबू सादा यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, रूग्णालयातील वीजपुरवठा होत नसल्याने आराेग्‍यसेवाच विस्‍कळीत झाली आहे. मुदतपूर्व प्रसूती झालेल्‍या अर्भकांचा मृत्‍यू होत आहे. वीज, अन्न आणि वैद्यकीय पुरवठा संपल्याने प्रमुख गाझा रुग्णालयातील ऑपरेशन्स थांबली आहेत. रूग्णालयात कर्मचारी, रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक असे हजारो नागरिक अडकले आहेत. दरम्यान येथील ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे सेवेच्या बाहेर आहे. त्यामुळे या रूग्णालयांशी कोणाही संपर्क होत नसल्याचे देखील जागतिक आराेग्‍य संघटनेने स्पष्ट केले आहे.
अल-शिफा हॉस्पिटलमध्ये ३०० लिटर इंधनचा पुरवठा
गाझा रूग्णालयातील साधनांच्या कमतरतेमुळे रुग्णालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. यानंतर इस्रायली लष्कराने अल-शिफा हॉस्पिटलमध्ये ३०० लिटर इंधन पोहोचवले. परंतु हमास सैन्याने त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.

“In the last 24 hours, the IDF delivered 300 liters of fuel to the Shifa Hospital’s doorstep, yet the fuel remains untouched after Hamas threatened hospital staff.”
The IDF is doing everything it can to mitigate harm to Gazan civilians and increase humanitarian aid. Our war is… pic.twitter.com/Z1maLsnwBQ
— Israel Defense Forces (@IDF) November 13, 2023

हमासच्या दहशतवाद्यांच्या साहित्यात हिटलरचे पुस्तक
इस्रायली लष्कराने  दावा केला आहे की, हमासच्या दहशतवाद्यांच्या साहित्यात हिटलरचे ‘मेन काम्फ’ हे पुस्तक सापडले आहे. या पुस्तकात अनेक नोट्सही लिहिण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हिटलरच्या विचारसरणीचे पालन केल्याने हमास ज्यूंचा द्वेष आणि छळ करायला शिकतो, असे लष्कराने म्हटले आहे. ही मानसिकता ते गाझामध्ये पसरवत, असल्याचे देखील इस्रायल लष्कराकडून स्पष्ट केले आहे.
हमासशी ‘ओलिस करार ‘होऊ शकतो :  नेतान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सांगितले की, हमास आणि गाझामधील इतर दहशतवादी गटांनी ओलिस धरलेल्या शेकडो ओलिसांपैकी काहींची सुटका करण्यासाठी “संभाव्य करार” होऊ शकतो. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, पॅलेस्टिनी सुरक्षा कैद्यांसाठी त्यांची अदलाबदल करण्याच्या उदयोन्मुखप्रस्ताव आहे. दरम्यान इस्रायल आणि हमासमध्ये ‘ओलिस करार ‘होऊन त्यानंतर युद्धाराम होण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केली आहे.
हेही वाचा:

Israel-Hamas war: हमास नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे : नेतान्याहू
Israel-Hamas war: इस्रायलने गाझा पट्टीतील २५०० हून अधिक ठिकाणांना केले लक्ष्य
Israel-Hamas War: ‘ऑपरेशन अजय’ : इस्रायलमधून सहावे विमान भारताकडे रवाना

The post गाझातील ‘अल शिफा’ रूग्णालयानजीकच धुमश्चक्री appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. गाझा शहरातील मुख्य रुग्णालयाजवळच हमास-इस्रायलमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे.  रूग्णालयांमधील वीजपुरवठा जवळपास पूर्णपणे खंडित झाला आहे. तसेच अन्न आणि पाण्याची देखील कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.  (Israel-Hamas war) गाझा शहरावर इस्रायलकडून जोरदार हल्ले केले …

The post गाझातील ‘अल शिफा’ रूग्णालयानजीकच धुमश्चक्री appeared first on पुढारी.

Go to Source