शिरोळ तालुक्‍यात ऊसदर आंदोलन पेटले, बैलगाड्या पेटवल्या

शिरोळ तालुक्‍यात ऊसदर आंदोलन पेटले, बैलगाड्या पेटवल्या

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा शिरोळ तालुक्यात अखेर शेतकरी संघटनेचे ऊसदर आंदोलन पेटले. दिवाळीनंतर पुन्हा एकदा ऊस दरासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर आली आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे ऊस बैलगाड्या पेटवल्या, तर टाकळीवाडीत आज (सोमवार) सकाळी 8 वाजता येथे उसाच्या बैलगाडी अडवून उलटवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने ऊस गाड्या कारखान्याकडे पाठवण्यात आल्‍या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाकळीवाडी येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील राखीव पोलीस दल दाखल झाले आहे.
आज सकाळी आठ वाजल्यापासून टाकळीवाडी येथे ऊसतोड सुरू होती. याबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्‍त होत होती. हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ऊसतोड बंद पडण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना विरोध केल्याने आंदोलन अधिक चिघळले आहे. रात्री अकिवाट येथे ऊस भरण्यासाठी निघालेल्या बैलगाड्या पेटवून देण्यात आल्‍या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालीघाटे,सागर शंभू शेट्टी, माजी सरपंच विशाल चौगुले, धनाजी चुडमंगे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील हजारो शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी टाकळीवाडी रस्त्यावरील सुरू असलेल्या ऊस तोडी थांबवण्याचा प्रयत्न केला. सपोनी रविराज फडणीस यांनी. संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि ऊसतोड मजुरांना टाकळीवाडी बाळूमामा मंदिर रस्त्यावर नेले. त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
The post शिरोळ तालुक्‍यात ऊसदर आंदोलन पेटले, बैलगाड्या पेटवल्या appeared first on पुढारी.

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा शिरोळ तालुक्यात अखेर शेतकरी संघटनेचे ऊसदर आंदोलन पेटले. दिवाळीनंतर पुन्हा एकदा ऊस दरासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर आली आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे ऊस बैलगाड्या पेटवल्या, तर टाकळीवाडीत आज (सोमवार) सकाळी 8 वाजता येथे उसाच्या बैलगाडी अडवून उलटवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने ऊस गाड्या …

The post शिरोळ तालुक्‍यात ऊसदर आंदोलन पेटले, बैलगाड्या पेटवल्या appeared first on पुढारी.

Go to Source