सोलापूर : राळेरास येथे वीज पडून बैल ठार; शेतकऱ्यावर ओढवले संकट

गुळवंची; पुढारी वृत्तसेवा : उत्तर सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात ठीक ठिकाणी विजांच्या कडकडाट जोराच्या वाऱ्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसत आहे. राळेरास (ता उत्तर सोलापूर) येथील शेतकरी काशिनाथ शिवाजी भोजरंगे (रा. होनसळ) यांच्या शेतात वीज कोसळून बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना  आज (दि. १४ ) सांयकाळी ५ च्या दरम्यान घडली. काशिनाथ …

सोलापूर : राळेरास येथे वीज पडून बैल ठार; शेतकऱ्यावर ओढवले संकट

गुळवंची; Bharat Live News Media वृत्तसेवा : उत्तर सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात ठीक ठिकाणी विजांच्या कडकडाट जोराच्या वाऱ्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसत आहे. राळेरास (ता उत्तर सोलापूर) येथील शेतकरी काशिनाथ शिवाजी भोजरंगे (रा. होनसळ) यांच्या शेतात वीज कोसळून बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना  आज (दि. १४ ) सांयकाळी ५ च्या दरम्यान घडली.
काशिनाथ भोजरंगे यांनी लिंबाच्या झाडाखाली बैल जोडी बांधली असता त्यातील एका बैलावर वीज पडल्याने एक बैल जागीच मृत्युमुखी पडला. शेतकरी भोजरंगे यावेळी समोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये आडोशाला बसले होते. मुलाबाळाप्रमाणे जपलेल्या बैलाचा स्वताच्या डोळ्यादेखत  वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर संकट ओढवले आहे. बैल मृत्युमुखी पडल्याने त्यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या मशागतीची कामे चालू असतानाच बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचा शोक अनावर झाला.