तालिबानमध्ये व्याभिचारी महिलांना आता दगडाने मारण्याची शिक्षा; टीव्हीवरूनच केली घोषणा

तालिबानमध्ये व्याभिचारी महिलांना आता दगडाने मारण्याची शिक्षा; टीव्हीवरूनच केली घोषणा

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा महिलांविरोधात हिणकस आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या शिक्षा देण्याचा प्रघात तालिबानकडून सुरू करण्यात येत आहे. व्याभिचाराबद्दल यापुढे महिलांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.