अकासा एअर नव्या देशांना सेवा सुरू करणार

अकासा एअर नव्या देशांना सेवा सुरू करणार

दक्षिण आशियाई देशांना विमान सेवा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात कार्यरत असणारी हवाई क्षेत्रातील कंपनी अकासा एअरची कामगिरी सध्याला चांगली होत असून आगामी काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या देशांना नवी विमान सेवा सुरू करण्याचे प्रयोजन कंपनी करत आहे. दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील काही देशांमध्ये नवी विमान सेवा सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये कंपनीची कामगिरी उत्तम झाली असून कंपनीच्या ताफ्यामध्ये सध्याला एकंदर 24 विमाने उपलब्ध आहेत. याचप्रमाणे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 4000 इतकी आहे.
कंपनी उत्तम कार्यप्रणालीसह नफ्याच्या दिशेने कार्यरत असून जास्तीत जास्त विमान सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
विमानात प्रवासी वाढले
ग्राहकांच्या तक्रारींची संख्यासुद्धा सर्वात कमी राहिली असून विमानातील प्रवाशांची संख्या अधिक दिसून आली आहे. दुसरीकडे विमानांची रद्द होण्याची संख्यासुद्धा खूपच घटली आहे.