मच्छे येथे पावसामुळे घराची भिंत कोसळली

मच्छे येथे पावसामुळे घराची भिंत कोसळली

वार्ताहर /किणये
तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे मारुती गल्ली, मच्छे येथील मारुती पालेकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. शनिवारी दुपारी सदर भिंत कोसळली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाला नाही. मच्छे परिसरात जोरदार पाऊस पडला. शनिवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. या पावसामुळे भिंत कोसळून पालेकर यांचे नुकसान झाले आहे. आसरा नसल्याने जीवनावश्यक साहित्याचेही नुकसान झाले. सोमवारी बऱ्यापैकी पावसाचा जोर ओसरला आहे.