Divorce Temple आगळंवेगळं घटस्फोट मंदिर जिथे महिला काडीमोड घेण्यासाठी जातात

डिव्होर्स टेम्पल किंवा घटस्फोट मंदिर हे नाव ऐकण्यात जितकं विचित्र आहे, तितकचं वेगळं यामागील विचार आहे. Matsugaoka Tokeiji नावाने प्रसिद्ध हे मंदिर 600 वर्षांपूर्वी तयार केले गेले होते. हे मंदिर जपानच्या कामाकुरा शहरात स्थित आहे. जपानमधील हे मंदिर …

Divorce Temple आगळंवेगळं घटस्फोट मंदिर जिथे महिला काडीमोड घेण्यासाठी जातात

आजच्या आधुनिक काळातही घटस्फोटित महिलांना अनेक प्रकारचे टोमणे आणि गोष्टी ऐकाव्या लागतात, परंतु शतकांपूर्वी एक काळ असा होता जेव्हा महिलांना घटस्फोट घेण्याचीही परवानगी नव्हती. घटस्फोट घेण्यास मनाई असल्याने त्यांना हा छळ सहन करावा लागला. जपानमधील एका आश्रमाने ते बदलण्याचा विचार करेपर्यंत हे असेच चालू राहिले.

 

12व्या आणि 13व्या शतकात जपानी समाजात घटस्फोटाच्या तरतुदी होत्या, पण त्या फक्त पुरुषांसाठी होत्या. पुरुष त्यांच्या पत्नींना सहजपणे घटस्फोट देऊ शकतात तर महिला घरगुती अत्याचाराविरुद्ध उभ्या राहू शकत नव्हत्या. वेगळे होण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नसल्याने त्यांना त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या पतींसाठी समर्पित करावे लागले.

 

तथापि 1285 मध्ये मातसुगोका टोकेई-जी (Matsugaoka Tokeiji), ज्याला घटस्फोट मंदिर ( Divorce Temple) म्हणूनही ओळखले जाते, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी त्याचे दरवाजे उघडले. चला जाणून घेऊया जपानच्या या खास मंदिराचा इतिहास.

 

टोकेई-जी मंदिराचा इतिहास

डिव्होर्स टेम्पल किंवा घटस्फोट मंदिर हे नाव ऐकण्यात जितकं विचित्र आहे, तितकचं वेगळं यामागील विचार आहे. Matsugaoka Tokeiji नावाने प्रसिद्ध हे मंदिर 600 वर्षांपूर्वी तयार केले गेले होते. हे मंदिर जपानच्या कामाकुरा शहरात स्थित आहे. जपानमधील हे मंदिर घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या अनेक महिलांचे घर आहे. याचे कारण खूप दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारे असेल, पण त्याची नितांत गरजही होती. अनेक शतकांपूर्वी अनेक स्त्रिया आपल्या अत्याचारी पतीपासून वाचण्यासाठी या मंदिरात आश्रय घेत असत.

 

हे खास मंदिर काकुसन-नी नावाच्या ननने तिचा पती होजो टोकिमून यांच्या स्मरणार्थ बांधले होते. येथे त्यांनी त्या सर्व महिलांचे स्वागत केले जे त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नव्हते आणि घटस्फोट घेण्याचा कोणताही मार्ग नव्हता.

 

मंदिरात पुरुषांना येण्याची परवानगी नव्हती

कामकुरा युगात कोणतेही कारण न सांगता पतींना त्यांचे लग्न संपवण्यासाठी फक्त औपचारिक घटस्फोट पत्र, “साडेतीन ओळींची सूचना” लिहिणे आवश्यक असायचे. तर दुसरीकडे महिलांना तसे अधिकार नव्हते. या लग्नातून पळून जाणे हाच एक पर्याय त्याच्यासमोर उरला होता. टोकेई-जी येथे तीन वर्षे राहिल्यानंतर, त्यांना त्यांच्या पतींसोबतचे वैवाहिक संबंध तोडण्याची परवानगी देण्यात आली. नंतर हा कालावधी केवळ दोन वर्षांवर आणण्यात आला.

 

या मंदिराला “अलगीकरण मंदिर” असेही संबोधले जात असे. 600 वर्ष जुन्या या मंदिरात 1902 पर्यंत पुरुषांना प्रवेश दिला जात नव्हता. यानंतर 1902 मध्ये जेव्हा एन्गाकू-जी यांनी या मंदिराची देखरेखीची जबाबदारी घेतली तेव्हा त्यांनी प्रथमच पुरुष मठाधिपतीची नियुक्ती केली.

 

हे बौद्ध मंदिर अमागोझन म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाच झेन ननरींच्या नेटवर्कचा एक भाग आहे. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर बाग आहेत आणि एक मुख्य हॉल आहे जो पाहुण्यांसाठी खुला आहे. मेजी काळात ते टोमितारो हारा या जपानी व्यापाऱ्याने विकत घेतले होते. 1923 मध्ये ग्रेट कांटो भूकंपामुळे मंदिराचे वास्तुशास्त्राचे मोठे नुकसान झाले आणि पुन्हा बांधण्यासाठी 10 वर्षे लागली. मंदिरात स्मशानभूमी देखील आहे आणि तेथे अनेक प्रसिद्ध व्यक्ती दफन आहेत.

 

मंदिराच्या मुख्य ननचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जात असे. काही वेळा अशा काही शाही स्त्रिया देखील राहिल्या आहेत ज्या आपल्या पतीच्या मृत्यूनंतर नन बनल्या आहेत, ही देखील एक जुनी जपानी परंपरा होती.

 

1873 मध्ये जपानमध्ये घटस्फोट कायदा लागू झाल्यानंतर मंदिराने महिलांना घटस्फोट देणे बंद केले असले तरी, मंदिर महिलांसाठी घटस्फोट कायदेशीर करण्यासाठी आणि त्यांना घरगुती अत्याचारापासून मुक्त होण्यासाठी जपानी समाजाच्या प्रयत्नांचे प्रतीक बनले.

डिव्होर्स टेम्पल किंवा घटस्फोट मंदिर हे नाव ऐकण्यात जितकं विचित्र आहे, तितकचं वेगळं यामागील विचार आहे. Matsugaoka Tokeiji नावाने प्रसिद्ध हे मंदिर 600 वर्षांपूर्वी तयार केले गेले होते. हे मंदिर जपानच्या कामाकुरा शहरात स्थित आहे. जपानमधील हे मंदिर …

Go to Source