ओडिशा निवडणुकीसाठी भाजपचे 112 उमेदवार जाहीर

ओडिशा निवडणुकीसाठी भाजपचे 112 उमेदवार जाहीर

भाजपचे 112 उमेदवार जाहीर, पटनायक विरोधात शिशिर मिश्रा
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भाजपने ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठी स्वत:च्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. पक्षाने पहिल्या यादीत 112 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 147 सदस्यीय विधानसभेच्या मागील निवडणुकांमध्ये भाजपने 10 जागा जिंकल्या होत्या. भाजप राज्यात यावेळी स्वबळावर विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवत आहे.
यापूर्वी भाजप आणि बिजू जनता दल यांच्यात आघाडी होणार असल्याची चर्चा होती. परंतु ही आघाडी आता होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील सत्तारुढ बिजू जनता दलाने यापूर्वीच स्वत:च्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
हिंजिली येथे पटनायक
मुख्यमंत्री नवीन पटनायक हे हिंजिली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने शिशिर मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. ओडिशात विधानसभेसाठी 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पुरी मतदारसंघात जयंत कुमार सारंगी हे भाजपचे उमेदवारी असतील. भाजपने प्रत्यूषा राजेश्वरी सिंह (नयागढ), कल्पना कुमारी कनहर (बालीगुडा), स्मृति रेखा पाही (धर्मशाळा), बबिता मलिक (बिंझपूर) आणि बोनाई येथून सेबती नायक यांना उमेदवारी दिली आहे.