किणये येथे आज कुस्ती मैदान

किणये येथे आज कुस्ती मैदान

बाल हनुमान कुस्ती संघटनेच्यावतीने आयोजन
वार्ताहर /किणये
बाल हनुमान कुस्ती संघटना किणये यांच्यावतीने खास चौरासीदेवी यात्रेनिमित्त गुऊवार दि. 30 रोजी दुपारी तीन वाजता भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. किणये बस स्टॉप जवळ आखाडा तयार करण्यात आलेला आहे. या आखाड्यात कर्नाटक चॅम्पियन कराळे खुर्द येथील कामेश पाटील व सांगली येथील महाराष्ट्र चॅम्पियन प्रदीप ठाकूर यांच्यात प्रथम क्रमांकची कुस्ती होणार आहे. कंग्राळी येथील कर्नाटक चॅम्पियन रोहित पाटील व सांगली येथील महाराष्ट्र चॅम्पियन मोहन नारे यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महेश तीर्थकुंडये व भांदूर गल्ली येथील सुरेश अथणी यांच्यात होणार आहे. पार्थ कंग्राळी व ऊद्रप्पा एम.ए.टी. यांच्यात चौथ्या क्रमांकाची कुस्ती होईल. पाचव्या क्रमांकाची कुस्ती ऊपेश कर्ले व ओम कंग्राळी यांच्यात होणार. सहाव्या क्रमांकाची कुस्ती सूरज कडोली व विनायक येळ्ळूर, सातव्या क्रमांकाची कुस्ती शंकर तीर्थकुंडये व कुबेर पिरनवाडी, आठव्या क्रमांकाची कुस्ती शिवम मुतगा व करण खादरवाडी, नवव्या क्रमांकाची कुस्ती सिद्धार्थ तीर्थकुंडे व अक्षय कडोली, दहाव्या क्रमांकाची कुस्ती समीर रणकुंडये व जोतिबा चापगाव यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर अन्य दहा आकर्षक कुस्त्या होणार आहेत. मानाचा गदा कुस्ती तुकाराम किणये व समाधान चिकोडी यांच्यात होणार आहे. आकर्षक कुस्ती विकास चापगाव व रोहन कडोली यांच्यात होईल. मेंढ्याची कुस्ती समर्थ डुकरे व आर्यन मुतगा यांच्यात होणार आहे. महिलांच्या कुस्त्याही होणार आहेत. जान्हवी विऊद्ध श्रावणी आंबेवाडी व निहारिका बागलकोट विऊद्ध प्रांजल तुळजाई यांच्यात कुस्त्या होणार आहेत. उद्घाटनाला किणयेसह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.