डोंबिवलीजवळ एसी लोकलवर दगडफेक, महिला जखमी

डोंबिवलीजवळ एसी लोकलवर दगडफेक, महिला जखमी

डोंबिवली-ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास टिटवाळा-सीएसएमटी वातानुकूलित लोकल ट्रेनवर दोन जणांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एक स्थानिक महिला जखमी झाली. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल होताच डोंबिवली रेल्वे पोलिसांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन जणांना अटक केली.
टिटवाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ट्रेन डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी नऊच्या सुमारास धावते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ही लोकल ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान असताना ठाकुर्लीजवळील वस्तीतून वातानुकूलित लोकलच्या खिडकीवर दगडफेक करण्यात आली. भरधाव वेगाने दगडफेक केल्याने काच फुटून दगड खिडकीजवळ बसलेल्या महिलेच्या अंगावर आदळला. तिला किरकोळ दुखापत झाली.
ही बाब तत्काळ ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आली. पोलिसांनी तात्काळ ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी ठाकुर्लीजवळील वस्तीत मद्यधुंद अवस्थेत दोघेजण रेल्वे रुळावर बसून दगडफेक करताना आढळून आले. पोलिसांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात त्यांचा माग काढला आणि त्यांना तात्काळ अटक केली. त्यांच्याविरुद्ध लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली.
हेही वाचाElvish Yadav: स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकला एल्विश यादववडाळ्यात महिलेची हत्या, धड आणि पाय कापून…

डोंबिवली-ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास टिटवाळा-सीएसएमटी वातानुकूलित लोकल ट्रेनवर दोन जणांनी दगडफेक केली. या दगडफेकीत एक स्थानिक महिला जखमी झाली. 

या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल होताच डोंबिवली रेल्वे पोलिसांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन जणांना अटक केली.

टिटवाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ट्रेन डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी नऊच्या सुमारास धावते. 

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ही लोकल ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान असताना ठाकुर्लीजवळील वस्तीतून वातानुकूलित लोकलच्या खिडकीवर दगडफेक करण्यात आली. भरधाव वेगाने दगडफेक केल्याने काच फुटून दगड खिडकीजवळ बसलेल्या महिलेच्या अंगावर आदळला. तिला किरकोळ दुखापत झाली.
ही बाब तत्काळ ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला कळवण्यात आली. 

पोलिसांनी तात्काळ ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी ठाकुर्लीजवळील वस्तीत मद्यधुंद अवस्थेत दोघेजण रेल्वे रुळावर बसून दगडफेक करताना आढळून आले. 

पोलिसांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात त्यांचा माग काढला आणि त्यांना तात्काळ अटक केली. त्यांच्याविरुद्ध लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली.


हेही वाचा

Elvish Yadav: स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकला एल्विश यादव

वडाळ्यात महिलेची हत्या, धड आणि पाय कापून…

Go to Source