बांबोळी येथे दोन सिलिंडरचा स्फोट
10 ते 15 झोपड्या जळून खाक : 40 हजारांचे नुकसान,सुदैवाने जीवितहानी टळली
पणजी : बांबोळी येथील आलदिया दी गोवाच्या परिसरात असलेल्या कामगारांच्या तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या झोपड्यांना आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दोन एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन स्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारात जीवितहानी झाली नसली तरी सुमारे 10 ते 15 झोपड्या जळून खाक झाल्या. सुमारे 40 हजार ऊपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गोवन रियल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कंपनीचा नवा प्रकल्प येत असल्याने या भागात प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुमारे 140 झोपड्या राहण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. दोन एलपीजी सिलिंडरांचा स्फोट होताच 140 पैकी सुमारे 10-15 झोपड्या जळून खाक झाल्या. या ठिकाणी आणखी 3 एलपीजी सिलिंडर सापडले होते. ते नंतर अग्निशामक दलातर्फे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. दरम्यान, जेव्हा ही घटना घडली तेव्हा या झोपड्यांमध्ये कुणीच नव्हते त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण एकंदरित सुमारे 40 हजार ऊपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी सुमारे 10. 44 वा. पणजी अग्निशामक दलाला या घटनेसंदर्भात कॉल आला होता. दलाने तत्परता दाखवत सुमारे 11 वा. घटनास्थळी दाखल होत, स्थिती नियंत्रणात आणली. यासाठी सुमारे दीड तास त्यांना लागला. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी पणजी अग्निशामक दलाचा एक आणि पणजी मुख्यालयाच्या एक बंब असे मिळून दोन बंब पाणी लागले. तसेच त्या ठिकाणी 2 टाकी पाणी कंपनीकडून उपलब्ध करण्यात आले होते, त्याचाही वापर करण्यात आला. पणजी अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी ऊपेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मोहीम पार पडली.
Home महत्वाची बातमी बांबोळी येथे दोन सिलिंडरचा स्फोट
बांबोळी येथे दोन सिलिंडरचा स्फोट
10 ते 15 झोपड्या जळून खाक : 40 हजारांचे नुकसान,सुदैवाने जीवितहानी टळली पणजी : बांबोळी येथील आलदिया दी गोवाच्या परिसरात असलेल्या कामगारांच्या तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या झोपड्यांना आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दोन एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन स्थिती नियंत्रणात […]