नौदलाच्या विमानांचा थरार नागरिकांचा उडाला थरकाप
पणजीकरांनी भल्या पहाटे 2 वाजता घेतला अनुभव : नागरिकांची झोपमोड
पणजी, वास्को : नौदलाच्या लढाऊ जेट विमानांचा वेग जितका थरारक असतो, त्याहीपेक्षा कैक पटींनी त्यांचा आवाज थरकाप उडविणारा असतो. ही विमाने उंच आभाळात आवाजाच्या गतीने वेगाने जाताना पाहणे हे नवलाईचे वाटत असले तरी जवळून त्यांचा आवाज ऐकल्यास काळजाचा ठोका चुकतो. काहीसा असाच अनुभव बुधवारी पहाटे पणजीसह पाटो, करंझाळे, टोंक, ताळगाव, दोनापावला, मेरशी आदी सभोवतालच्या भागातील नागरिकांनी घेतला. पहाटे दोनच्या सुमारास जेट इंजिनच्या थरकाप उडविणाऱ्या गर्जनेने अनेक नागरिकांची झोपमोड झाली. जमिनीपासून अत्यंत जवळून गेलेल्या विमानांचा आवाज एवढा प्रचंड होता की, त्यामुळे अनेकांची अक्षरश: घाबरगुंडी उडाली. आमच्यावर कुणी हल्ला करतो की काय? किंवा एखादा अज्ञात धोका रोखण्यासाठी लढाऊ विमाने उडाली होती का, पावसाळी गडगडाट की अन्य काही संशयास्पद आवाज, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाले. सकाळी ’मॉर्निंग वॉक’ ला जाणाऱ्या अनेकांच्या तोंडीही हीच चर्चा ऐकू येत होती. यापैकी काहीजणांनी तर बोलताना, आयुष्यात प्रथमच आपण पणजी शहरात तेही भल्या पहाटे एवढ्या जवळून गेलेले विमान किंवा लढाऊ जेटचा आवाज ऐकल्याचे सांगितले. दरम्यान, झोपमोड झाल्याने जागे झालेले नेटकरी लगेच सोशल मीडियावर सक्रिय झाले. त्यामुळे लगेचच असंख्य प्रश्नांनी सोशल मीडिया भरून गेला. मात्र त्यानंतर नौदलाने अशा प्रश्नांचे निराकरण करताना, लढाऊ विमानांचा हा एक नित्याचा सराव होता, असे स्पष्ट केले.
हा आवाज लढाऊ हवाई जहाजांचा
अवकाशात झालेला आवाज हा लष्करी हवाई उ•ाणांचा आवाज होता, असा खुलासा भारतीय नौदलाच्या सूत्राने केला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील चर्चा, भीती व संशयाला विराम मिळाला आहे. नौदलाच्या नियमित सरावाचा तो भाग होता. दोन हजार कि.मी.च्या वेगाने उडालेली ही हवाई जहाजे फारच उंचावर होती. अशा सरावाद्वारे लक्ष्य गाठून सज्जतेची पडताळणी करण्यात येत असते, असे सूत्राने सांगितले.
Home महत्वाची बातमी नौदलाच्या विमानांचा थरार नागरिकांचा उडाला थरकाप
नौदलाच्या विमानांचा थरार नागरिकांचा उडाला थरकाप
पणजीकरांनी भल्या पहाटे 2 वाजता घेतला अनुभव : नागरिकांची झोपमोड पणजी, वास्को : नौदलाच्या लढाऊ जेट विमानांचा वेग जितका थरारक असतो, त्याहीपेक्षा कैक पटींनी त्यांचा आवाज थरकाप उडविणारा असतो. ही विमाने उंच आभाळात आवाजाच्या गतीने वेगाने जाताना पाहणे हे नवलाईचे वाटत असले तरी जवळून त्यांचा आवाज ऐकल्यास काळजाचा ठोका चुकतो. काहीसा असाच अनुभव बुधवारी पहाटे […]