श्वानाच्या पिल्लांना सुरक्षितस्थळी हलविले

श्वानाच्या पिल्लांना सुरक्षितस्थळी हलविले

बेळगाव : भाग्यनगर सहावा क्रॉस येथे उघड्यावर ठेवलेल्या ड्रेनेज पाईपमधील श्वानाच्या पिल्लांना अग्निशमन दलाकडून सुरक्षितस्थळी हलविले. मोकळ्या जागेमध्ये ठेवलेल्या ड्रेनेज पाईप लाईनमध्ये श्वानांच्या पिल्लांचा आवाज ऐकून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही. यावेळी श्वानप्रेमी प्रज्ञा चिंचेवाडीकर यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन श्वानांच्या पिल्लांचे संरक्षण करून सुरक्षितस्थळी हलविले.