पृथ्वीवरील सर्वात जुना पर्वत

पृथ्वीवरील सर्वात जुना पर्वत

जणू आकाशात तरंगणाऱ्या बेटासारखे दृश्य
माउंट रोराइमा पृथ्वीवरील सर्वात जुन्या पर्वतांपैकी एक आहे. दक्षिण अमेरिकेतील हा एक आकर्षक टेबलटॉप माउंटेन आहे. या पर्वतावरील पृष्ठभाग आश्चर्यकारकपणे अत्यंत समतल आहे, हा पर्वत ब्राझील, गयाना आणि व्हेनेझुएला या देशांच्या जंक्शनवर स्थित आहे. व्हेनेझुएलाचा एक मोठा हिस्सा ग्रॅन सबानाच्या मैदानांवर आकाशात तरंगणाऱ्या एका बेटाप्रमाणे हा पर्वत दिसून येतो.
हा पर्वत पाकैरिमा पर्वतरांगेचा हिस्सा असून तो अद्वितीय संरचना, वन्य प्राणी अणि पृथ्वीवर अन्य कुठेच आढळून न येणाऱ्या वृक्षांनी वेढलेला आहे. हा पर्वत या क्षेत्रातील सर्वात नैसर्गिक स्थळांपैकी एक आहे.
माउंट रोराइमाला रोराइमा टेपुई किंवा रोराइमा या नावाने देखील ओळखले जाते. हा पर्वत घनदाट जंगलाने वेढला गेलेला असून याच्या चहुबाजुला ढग दिसून येतात. हा पर्वत दक्षिणपूर्व व्हेनेझुएलाच्या ग्रॅन सबाना क्षेत्रात कनैमा नॅशनल पार्कमध्ये आहे. याचा विस्तार ब्राझील आणि गयाना या देशांच्या क्षेत्रांमध्ये देखील आहे.
हा पर्वत जवळपास 2,810 मीटर उंच असून सुमारे 31 चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्राला व्यापून टाकणारा आहे. पर्वताच्या चहुबाजूला उंच शिखरं असल्याने याला एक आकर्षक आणि अद्वितीय स्वरुप प्रदान झाले आहे. माउंट रोराइमा पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना येथे अद्वितीय आणि थक्क करून टाकणारी नैसर्गिक दृश्यं पाहण्याची संधी मिळत असते. टेबलटॉप शिखर, धबधबे आणि दुर्लभ वनस्पती तसेच वन्यप्राणी येथे पहायला मिळतात.