T20 WC : T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवीन जर्सी हेलिकॉप्टरमधून लाँच

पुढील महिन्यात T20 विश्वचषक सुरु होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. भारतासह अनेक संघांनीही या स्पर्धेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना 1 जून …

T20 WC : T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवीन जर्सी हेलिकॉप्टरमधून लाँच

social media

पुढील महिन्यात T20 विश्वचषक सुरु होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. भारतासह अनेक संघांनीही या स्पर्धेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना 1 जून रोजी होणार आहे.

 

टीम इंडिया 5 जून रोजी न्यूयार्कमध्ये आयर्लंड विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या T20 विश्वचषक सामन्यात भारतीय संघ नव्या जर्सी मध्ये उतरणार आहे. बीसीसीआय ने T20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच केली आहे. बीसीसीआयने नवीन जर्सी लाँच करण्यासाठी खास शैली अवलंबली. टीम इंडियाची नवीन T20 जर्सी हेलिकॉप्टरमधून लॉन्च करण्यात आली.  

याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये कर्णधार रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा दिसत होते. रोहित जडेजाला काही सिग्नल देत आहे. त्या नंतर एक हेलिकॉप्टर दिसले आणि टीम इंडियाची नवी जर्सी टांगलेली दिसली. हे पाहून जडेजा, रोहित आणि कुलदीप यांना आश्चर्य होतो. 

 

BCCI ने अधिकृत किट प्रायोजक म्हणून आदिदास मध्ये सामील झाल्यापासून, भारतीय खेळाडू दोन पांढऱ्या-बॉल फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या डिझाइन केलेल्या जर्सी परिधान करत आहेत.

बीसीसीआयने 30 एप्रिल रोजी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती, तर हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले होते. शिवम दुबेचा संघात समावेश होता, तर रिंकू सिंगला वगळण्यात आले होते. त्याचवेळी संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांनीही टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले.

Edited By- Priya Dixit 

 

Go to Source