सुमित नागल ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या मार्गावर
वृत्तसंस्था/ हेलब्रोन (जर्मनी)
रविवारी येथे झालेल्या हेलब्रोनेर नेकरकप एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताचा टॉप सिडेड टेनिसपटू सुमित नागलने एकेरीचे जेतेपद पटकाविताना स्विसच्या रिचकार्डचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात नागलने रिचकार्टचा 6-1, 7-6 (7-5), 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे सुमित नागलने एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या 80 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. सुमित नागल आता पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रतेच्या समीप पोहोचला आहे. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत 26 वर्षीय सुमीत नागलने प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते. पण त्याला दुसऱ्या फेरीतच हार पत्करावी लागली होती. त्यानंतर झालेल्या इंडियन वेल्स मास्टर्स तसेच माँटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत सुमीत नागलने पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश मिळविला होता.
Home महत्वाची बातमी सुमित नागल ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या मार्गावर
सुमित नागल ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या मार्गावर
वृत्तसंस्था/ हेलब्रोन (जर्मनी) रविवारी येथे झालेल्या हेलब्रोनेर नेकरकप एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताचा टॉप सिडेड टेनिसपटू सुमित नागलने एकेरीचे जेतेपद पटकाविताना स्विसच्या रिचकार्डचा पराभव केला. पुरुष एकेरीच्या झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात नागलने रिचकार्टचा 6-1, 7-6 (7-5), 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेतील अजिंक्यपदामुळे सुमित नागलने एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या 80 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. […]