सोळा जणांना जन्मठेपेची शिक्षा
► वृत्तसंस्था / औरंगाबाद
‘करणी’ केल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीची हत्या केल्याच्या प्रकरणात बिहार मधील औरंगाबाद येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 16 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. गुन्हा 13 ऑगस्ट 2020 या दिवशी घडला होता. जिल्ह्याच्या इब्राहिमपूर नामक खेड्यातील जगदीश राम या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या संदर्भात या 16 जणांना पोलिसांनी अटक केली होती.
सुरेश राम, रविंद्र राम, सुरेंद्र राम, सत्येंद्र राम, महाराज राम, उदय राम, शत्रुघ्न राम, विनीत राम, मनोरमा देवी, सुदामा राम, बलिंदर राम, राकेश राम, राजन राम, ललिता देवी आणि मुकेश राम अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी जगदीश राम यांच्या पत्नीने तक्रार सादर केली होती. या तक्रारीच्या आधारावर चौकशी करण्यात आली. एकाच वेळी इतक्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची या जिल्ह्यातील ही प्रथमच घटना आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.
Home महत्वाची बातमी सोळा जणांना जन्मठेपेची शिक्षा
सोळा जणांना जन्मठेपेची शिक्षा
► वृत्तसंस्था / औरंगाबाद ‘करणी’ केल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीची हत्या केल्याच्या प्रकरणात बिहार मधील औरंगाबाद येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 16 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. गुन्हा 13 ऑगस्ट 2020 या दिवशी घडला होता. जिल्ह्याच्या इब्राहिमपूर नामक खेड्यातील जगदीश राम या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या संदर्भात या 16 जणांना पोलिसांनी अटक केली होती. […]