श्रीक्षेत्र माहूर गड
नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर वसले आहे.माहूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. ते नांदेड शहरापासून 130 किलोमीटर अंतरावर आहे.
हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. या किल्ल्यामध्ये अनेक वन्यजीव आढळून येतात.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता आहे .श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते.
माहूर ला बघण्यासारखे म्हणजे रामगड म्हणजे माहूर किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी,राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुखांचा वाडा असे काही ऐतिहासिक वास्तू माहूरमध्ये बघण्यासारखे आहे.श्रीरेणुकादेवीमंदिर, अनुसयामाता मंदिर, देवदेवेश्वर मंदिर इ. धार्मिकस्थळे माहूरला आहेत.गावात एक छोटेखानी पुराणवस्तुसंग्रहालय आहे. त्यात कलाकुसरीच्या अनेक वस्तू व पुरातन शिल्पे ठेवली आहेत. त्यातील अंगठ्याएवढी बालाजीची मूर्ती बघण्यासारखी आहे.
या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत.नवरात्रात या गडावर भाविकांची गर्दी असते. हे शक्तिपीठ अत्यंत जागृत असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. कुब्ज नगराचा राजा “प्रसेनजित” याला अपत्य नव्हते. अनेक व्रत, वैकल्ये केल्यानंतर खूप दिवसांनी त्याच्या पोटी आदिशक्ती पार्वती मातेने स्वतः जन्म घेतला. त्या राजाने आपल्या कन्येचे नाव “रेणुका ठेवले.रेणुका उपवर झाल्यावर तिचे लग्न जमदग्नी ऋषींशी झाले. ऋषी जमदग्नी यांना शंकराचे अवतार मानले जातात. त्यांच्या आश्रमात कामधेनू नावाची गाय असे. कामधेनू सर्व कामना पूर्ण करणारी होती. या गायीची कीर्ती दूरवर पोहोचली होती. त्या गायीची प्रसिद्धी राजा सहस्रार्जुनापर्यंत पोहोचली त्याने आश्रमात येऊन गायीची मागणी ऋषींकडे केली. त्यावर ऋषींनी कामधेनू देण्यास राजाला नकार दिला. या वर संतापून राजाने ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला आणि नासधूस केली. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदाग्निंचा वध केला. नंतर मेहुणी रेणुकेवर 21 वार केले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हते. परशुराम आल्यावर त्याला जे दृष्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्रार्दुना माझा पराक्रमी राम एकविस वेळ ही पृथ्वी नि:क्षत्रिय करेल.
परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पुर्ण करेन. परशुरामाने कावड करून एकाबाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन ते पित्याच्या अंतविधीसाठी ते पवित्र भूमी शोधत निघाले. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्हात किनवट तालुक्यात पोहचले. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत विधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे. हे परशुरामाला पाहवेना ते फार दुखी झाले. त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपणं आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जिवीत झाली. पण आताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुख:द प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे ते व्याकुळ झाले. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खुप ऊपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावले मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली, नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार ह्रदयभेदक तो प्रसंग पहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दुर गेले. सहा दिवसांनी माता-पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आले. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मुर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मुर्ती स्थापन केली.
असे म्हणतात की जमदग्नी ऋषींच्या सांगण्यावरून आई रेणुकेचे मस्तक तिचा मुलगा परशुराम याने छाटले होते. याबाबत माहूर संस्थानचे पुजारी संजय काण्णव यांनी सांगितले की, आई रेणुका दररोज जवळच्या नदीतून कळशीत पाणी आणत असे. त्यानंतर जमदग्नी ऋषी या पाण्यात स्नान करून महादेवाची पूजा करायचे, पण एके दिवशी पाणी आणण्यास विलंब झाला. जेव्हा सूर्यास्तापर्यंत पाणी आले नाही तेव्हा ऋषी जमदग्नींना समजले की त्यांचे ब्राह्मणत्व संपले आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या पुत्र परशुरामला आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला.
परशुरामांनी आज्ञा पाळली. हे पाहून ते समाधानी झाले आणि त्याने परशुरामाला वरदान मागायला सांगितले. तेव्हा मुलाने आई रेणुकाला पुन्हा जिवंत करण्यासाठी वरदान मागितले. जमदग्नी ऋषींनी याला निसर्गाच्या विरुद्ध म्हटले आणि 21 दिवसात आई रेणुका प्रकट होईल असे सांगितले. मातेच्या दर्शनामुळे प्रत्येक नवस पूर्ण होतो.
पाण्याची गरज असताना परशुरामांनी बाण मारून मातृतीर्थ कुंड बांधले होते. 13 दिवसांनी आणि आई-वडिलांचे सर्व विधी पूर्ण करून, भगवान परशुराम त्यांच्या वियोगावर खूप रडले. यावेळी आई रेणुका त्यांच्यासमोर हजर झाल्या. परशुराम झुला मंदिरात परशुराम झुला देखील आहे. निपुत्रिक जोडप्यांना मूल व्हावे अशी इच्छा असते आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर एक छोटा झुला आणून मंदिरात अर्पण केला जातो. त्याला परशुराम झुला म्हणतात. या ठिकाणी अनेक झुले दिसतात. जमदग्नी ऋषी हे शिवाचे महान भक्त होते. तो स्वतःच्या मंदिरात पूजा, जप आणि तपश्चर्या करत असे. या मंदिरात शिवलिंग, नागराज, नंदी आदींच्या मूर्तीही आहेत.
माहूर गडावर रामगड किल्ला आहे हा समुद्रसपाटी पासून 26 फूट उंचीवर असून या किल्ल्याचे बांधकाम अत्यंत जुने आहे. या किल्ल्याला गिरिदुर्ग असे ही म्हणतात. हा किल्ला यादवकालीन आहे. याला दोन तटे आहे. एक तट राष्ट्रकूट घराण्यातील राजाने बांधला. तर दुसऱ्या तटाला यादव कुळातील राजा रामदेवराय यांनी बांधला. हा किल्ला काही दिवस गौड राजांच्या अधिपत्याखाली होता. या मुळे ह्याला गौड किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.
परशुराम झुला
मंदिरात परशुराम झुला देखील आहे. निपुत्रिक जोडप्यांना मूल व्हावे अशी इच्छा असते आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर एक छोटा झुला आणून मंदिरात अर्पण केला जातो. त्याला परशुराम झुला म्हणतात. या ठिकाणी अनेक झुले दिसतात. जमदग्नी ऋषी हे शिवाचे महान भक्त होते. तो स्वतःच्या मंदिरात पूजा, जप आणि तपश्चर्या करत असे. या मंदिरात शिवलिंग, नागराज, नंदी आदींच्या मूर्तीही आहेत. स्कंद पुराणात परशुरामांना रेणुका मातेचे दर्शन दिल्यानंतर धर्मराज आणि मार्कंडेय ऋषी यांच्यातील संभाषणही नोंदवलेले आहे. रेणुका माता मंदिरासमोर रामगड किल्ला असून त्यावर महाकालीचे मंदिर आहे. माहूर संस्थानचे विश्वस्त व पुजारी सप्तमीला या देवीला अष्टमीला होम हवन करून आमंत्रण देण्यासाठी जातात. येथे भगवान परशुरामाचे मंदिर देखील आहे. येथे येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून तांबूल (ज्याला मसाला पान म्हणतात) देखील दिले जाते.
कसे जायचे –
* नांदेड पर्यंत लोहमार्गाने मध्य रेल्वेवर येते. मुंबई, पुणे, हेदराबाद, औरंगाबाद, तसेच बंगळूर येथून नांदेड ला रेल्वे ने थेट जाऊ शकतो.
* माहूर पर्यंत- नांदेड ते माहूर एसटीची बस सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चालते.हा सुमारे तीन तासाचा प्रवास आहे.
* माहूर गावापासून टेकडी मंदिर-शहरातून टेकडी पर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या तसेच काही खासगी सेवा देखील मिळतात.
* नागपूर ते माहूर -(वर्धा-यवतमाळ-मार्गे) रस्त्याने सुमारे 220 किलोमीटर आहे. या प्रवासासाठी राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या व काही अत्यल्प खाजगी वाहनेही मिळतात.
माहूरला राहण्याची उत्तम सोय आहे येथे राहण्यासाठी भक्तवात्सल्या आश्रम आहेत.