पलूसचे मंडल अधिकारी अन् एजंटाला साडेसात हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

पलूसचे मंडल अधिकारी अन् एजंटाला साडेसात हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

सांगली लाचलुचपत विभागाची कारवाई: पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी
पलूस येथील मंडळ आ†धकारी तानाजी शामराव पवार (52 वर्षे, रा. पवार गली, कणेगाव, ता. वाळवा, ा†ज. सांगली) व खासगी इसम प्रसाद गजानन चव्हाण (54 वर्षे, रा. आमणापूर रोड, दा†क्षण बाजू वार्ड नं. 5 बुली, ता. पलूस, जि. सांगली) यांना साडेसात हजार ऊपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सांगली लाचलुचपत प्रा†तबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. या दोघांविरूद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उा†शरापर्यंत सुऊ होते.
तक्रारदार यांचे मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची तलाठी पलूस यांनी धरलेली नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ आ†धकारी तानाजी शामराव पवार व त्यांचे हाताखाली मदतनीस म्हणून काम करणारे खासगी इसम प्रसाद गजानन चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000/- रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभाग सांगली पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता मंडल अधिकारी तानाजी पवार यांचे हाताखाली मदतनीस म्हणून काम करणारे खासगी इसम प्रसाद गजानन चव्हाण यांनी तक्रारदार यांचे मित्राने खरेदी केलेल्या जमिनीची तलाठी पलूस यांनी धरलेली नोंद मंडल अधिकारी यांना सांगून मंजूर करण्यासाठी स्वत:करिता व मंडल अधिकारी पवार यांच्याकरीत दहा हजार ऊपये लाचेची मागणी कऊन तडजोडीअंती साडेसात हजार ऊपये लाचेची मागणी केल्याचे ा†नष्पˆ झाले.
त्यानंतर मंगळवारी पलूस तहसील कार्यालय, याठिकाणी सापळा लावला असता मंडल आधिकारी तानाजी पवार यांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करणारे खासगी इसम प्रसाद गजानन चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून साडेसात हजार रूपये लाच रक्कम स्वीकारली असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. खासगी इसम प्रसाद चव्हाण यांचे लाच स्वीकृतीस मंडल आ†धकारी तानाजी पवार यांनी प्रोत्साहन दिले असल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्या†वऊध्द पलूस पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रा†तबंध आ†धा†नयमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुऊ आहे.
सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक, संदीप पाटील, पोलीस निरीक्षक, दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, राधीका माने, ऋषिकेश बडणीकर, सलीम मकानदार धनंजय खाडे, चंद्रकांत जाधव, उमेश जाधव, अतुल मोरे, सीमा माने, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी केली आहे.