पावसाळी साहित्य खरेदीसाठी लगबग

पावसाळी साहित्य खरेदीसाठी लगबग

आकर्षक छत्र्या, रेनकोट, प्लास्टिक कापड उपलब्ध
पणजी : पावसाळा जवळ आल्याने सध्या बाजारांत पावसाळी साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसू लागली आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल तसेच इतर पावसाळी साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्यातील सर्वच बाजारापेठेमध्ये, असे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. बुधवारी पणजी मार्केटमध्ये ग्राहक विविध प्रकारचे पावसाळी साहित्य खरेदी करताना दिसत होते. पावसाळा सुऊ झाल्याने रेनकोट, छत्र्यांना मागणी वाढली आहे. बाजारामध्ये विविध आकर्षक असे रेनकोट उपलब्ध आहेत. पुऊष, महिला तसेच लहान मुलांसाठी विविध आकाराचे रेनकोट उपलब्ध  आहेत. 500 ऊपयांपासून 1500 ऊपयांपर्यंत आणि पुढील किमतीतही ते उपलब्ध आहेत. तसेच छत्र्याही विविध प्रकारच्या आलेल्या असून छत्री 150 ते 600 ऊपयांपर्यंत उपलब्ध आहे. प्लास्टिक कापड, ताडपत्री यालाही मागणी वाढली आहे. सध्या बाजारात रेनकोट, छत्र्या आणि प्लास्टिक कापड व ताडपत्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. पातळ व जाड अशा प्लास्टिक ताडपत्र्या बाजारात उपलब्ध असून, 40 ते 100 ऊपये मीटरपर्यंत त्यांची किंमत आहे.
शालेय वस्तुंची खरेदी
यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत दरामध्ये थोडी वाढ झाल्याचे व्यापारी व ग्राहकांचे म्हणणे आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शाळा सुरू होणार असल्याने अनेक पालक आपल्या मुलांसह बाजारात शालेय साहित्य खरेदी करत आहेत. मुलांना नवीन बॅग, वह्या, कपडे, तसेच इतर साहित्य खरेदी केले जात आहे.