योगा कार्यक्रमात नाचताना निवृत्त जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

योगा कार्यक्रमात नाचताना निवृत्त जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

अलीकडेच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे प्रमाण वाढत  आहे. कार्यक्रमात समारंभात नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे वृत्त समोर येत आहे. असेच काहीसे घडले आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथे. 

एका योगा क्लास मध्ये प्रस्तुतीकरण देत असताना निवृत्त जवानाचा  हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या वेळी हा त्यांच्या परफॉर्मेंसचा भाग समजून लोक टाळ्या वाजवत राहिले. बलबीरसिंग छाबरा असे या निवृत्त जवानाचे चे नाव आहे. 

योग कार्यक्रमात डांस करत असलेल्या निवृत्त सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, काही क्षण कोणालाच कळलेच नाही#Indore #heartattack #DKshivakumar #trending pic.twitter.com/2RoiykfjIn
— Webdunia Marathi (@MarathiWeb18507) May 31, 2024

बलबीरसिंग हे एका योगाच्या कार्यक्रमात प्रस्तुती देत असताना हातात झेंडा घेऊन माँ तुझे सलाम या गाण्यावर नाचत असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांच्या छातीत दुखू लागले. नन्तर ते मंचावर कोसळले लोकांना वाटले हा त्यांच्या प्रस्तुतीकरणाचा एक भाग आहे म्हणून तिथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवायला सुरु केले. मात्र बराच वेळ झाला तर ते उठले नाही. एका तरुणाने त्यांना उठवायचा प्रयत्न केला असता ते उठले नाही त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

Edited By – Priya Dixit 

 

Go to Source