व्होट बँकेसाठी टाळले राममंदिर !

मुस्लीमांची मते गमवावी लागतील, यासाठीच राहुल गांधी यांनी अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिराला भेट देणे टाळले आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याने अल्पावधीत भगवान रामलल्लांचे मंदिर होऊ शकले. त्यामुळे भारतातील आणि जगभरातील अब्जावधी हिंदूंनी 500 वर्षे पाहिलेले स्वप्न साकार झाले, असे […]

व्होट बँकेसाठी टाळले राममंदिर !

मुस्लीमांची मते गमवावी लागतील, यासाठीच राहुल गांधी यांनी अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिराला भेट देणे टाळले आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्याने अल्पावधीत भगवान रामलल्लांचे मंदिर होऊ शकले. त्यामुळे भारतातील आणि जगभरातील अब्जावधी हिंदूंनी 500 वर्षे पाहिलेले स्वप्न साकार झाले, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.
ते महाराष्ट्रातील धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत भाषण करीत होते. काँग्रेसला हिंदू धर्म आणि हिंदू जनतेच्या देवतेवता यांच्यासंबंधी आदर नाही. काँग्रेसला तिची खोटी धर्मनिरपेक्षता अधिक प्रिय आहे. लांगूलचालनाचे आपले धोरण बिघडू नये म्हणून काँग्रेसने कधी घटनेच्या अनुच्छेद 370 ला हात लावण्याचे धाड केले नाही. भारतीय जनता पक्षाने या संबंधातील आपली सर्व आश्लासने पूर्ण केली आहेत. काँग्रेसचा मित्रपक्ष बनलेला उद्धव ठाकरे गट या अनुच्छेदाच्या विरोधात आमच्यासमवेत होता. तथापि, आज यासंबंधी काँग्रेसची जी भूमिका आहे. त्यावर ठाकरे यांचे मत काय आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान त्यांनी दिले.