गुजरात-केकआर सामना पावसामुळे रद्द
गुजरात प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर : केकेआरचे अव्वलस्थान आणखी मजबूत
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरात टायटन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलमधील सोमवारचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. 11 गुणांसह गुजरात आठव्या स्थानावर असून त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अंधुक आशाही संपुष्टात आल्या. त्यांचा आता केवळ सामना बाकी आहे. पण त्या निकालाचा त्यांना फारसा फायदा होणार नाही.
आजच्या एका गुणांसह केकेआरचे 19 गुण झाले असून त्यांचे अग्रस्थान कायम आहे. मात्र राजस्थानचे दोन सामने बाकी असले तरी केकेआरचे टॉप दोनमधील व क्वालिफायर एकमधील स्थान निश्चित असेल. यापूर्वीही त्यांनी दोनदा टॉप दोनमध्ये स्थान मिळविले होते आणि दोन्ही वेळेस त्यांनी जेतेपद पटकावले होते.
पावसामुळे नेहमीच्या वेळेत नाणेफेकही होऊ शकली नाही. रात्री अकराच्या सुमारास सामना सुरू करून प्रत्येकी 5 षटकांचा खेळ घेण्याचा त्यांचा विचार होता. पण पावसामुळे तेही शक्य होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मोसमात पावसामुळे रद्द झालेला हा पहिला सामना आहे. केकेआरचा शेवटचा सामना दि. 19 रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. राजस्थानचेही प्लेऑफमधील आव्हान जवळपास निश्चित झाले आहे. राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील विजेता संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहणार आहे.
घरच्या मैदानावरील गुजरातचा हा शेवटचा सामना होता. त्यात विजय मिळवून निरोप घेण्याचा त्यांचा विचार होता. पण पावसाने त्यांचे मनसुबे उधळून लावले. सामना रद्द झाल्याचे घेषित केल्यानंतर गुजरात संघाने मैदानाभोवती फेरी मारत घरच्या प्रेक्षकांचे आभार मानत त्यांचा निरोप घेतला.
2021 पासून प्रथमच शुभमन गिल आयपीएलच्या अंतिम फेरीत खेळताना दिसणार नाही. 2021 मध्ये केकेआरकडून तो अंतिम फेरीत खेळला होता. तर मागच्या दोन मोसमात तो गुजरातकडून अंतिम लढतीत खेळला होता.
Home महत्वाची बातमी गुजरात-केकआर सामना पावसामुळे रद्द
गुजरात-केकआर सामना पावसामुळे रद्द
गुजरात प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर : केकेआरचे अव्वलस्थान आणखी मजबूत वृत्तसंस्था/ अहमदाबाद गुजरात टायटन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलमधील सोमवारचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. 11 गुणांसह गुजरात आठव्या स्थानावर असून त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अंधुक आशाही संपुष्टात आल्या. त्यांचा आता केवळ सामना बाकी आहे. पण त्या […]