नेहमी ‘सत्याचाच विजय’; आपचे खासदार संजय सिंह यांच्या जामिनानंतर आपची प्रतिक्रिया

नेहमी ‘सत्याचाच विजय’; आपचे खासदार संजय सिंह यांच्या जामिनानंतर आपची प्रतिक्रिया

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात तुरुंगात असलेले राज्यसभा खासदार संजय सिंह यांना आज जामीन मंजूर झाला आहे. खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाल्यानंतर नेहमी सत्त्याचाच विजय होतो अशा आशयाची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने दिली आहे.
दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना आज अखेर जामीन मंजूर झाला. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे स्वता याच प्रकरणात ईडीच्या आरोपानंतर अटकेत असल्याने खासदार संजय सिंह यांच्या या सुटकेनंतर आपच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून आलेल्या आदेशानंतर लगेचच पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी , “21 मार्च हा मोठा दिवस होता आणि त्या दिवसापासून गोष्टी बदलू लागल्या. आज 2 एप्रिल रोजी ‘आप’ची या संकटातूनही सुटका झाली आहे. आज, सर्वोच्च न्यायालयाने खासदार संजय सिंगच्या जामीन याचिकेवर सुनावणी केली आहे. न्यायाधीशांनी स्वतः केंद्राला आणि ईडीला काही प्रश्न विचारले, पण या प्रश्नाची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती,” असे त्यांनी म्हटले आहे.