केसं पाढरी झालीतं यातं…मला कोणी शहाणपणा शिकवू नये…स्वत:ची परिस्थिती तपासा; धैर्यशील माने यांना राजू शेट्टींचा टोला

केसं पाढरी झालीतं यातं…मला कोणी शहाणपणा शिकवू नये…स्वत:ची परिस्थिती तपासा; धैर्यशील माने यांना राजू शेट्टींचा टोला

उसाची तीन टप्प्यात एफआरपी करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवणार होता त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार होतं. तसेच शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी महाविकास आघाडीने पायघड्या घालून ठेवल्या होत्या. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हे आमचं पक्क ठरलं होतं. त्यामुळे या राजकारणात आणि चळवळीमध्ये माझे केस पाढरे झाले आहेत. तुम्हाला तुमच्या मित्रपक्षांकडून जवळ केलं जात नाही. माझ्या न जाण्याने भाजपविरोधी मतांचं काय होणार आहे त्याची काळजी करण्याचे कारण मला नाही अशा शब्दात राजू शेट्टी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पहा VIDEO >>> मित्रपक्षाचे लोक तुम्हाला जवळ करत नाहीत; धैर्यशील माने यांना राजू शेट्टींचा टोला
कोल्हापूरामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीला पाठींबा दर्शविण्यासाठी शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे बैठकीस्थळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पहा VIDEO >>> साखरपुडा झाला…पण लग्न जमलं नाही; महायुतीमध्ये मोठा वाद- सतेज पाटील
आमची केसं पांढरी झालीत यात…..
राजू शेट्टी यांची बिकट अवस्था झाल्याची टिका काही दिवसापुर्वी धैर्यशील माने यांनी केली होती. त्याचा खरपूस समाचार घेताना राजू शेट्टी यांनी जोरदार टिका केली. राजकारणात मला आता कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही…चळवळीतून आणि राजकारणातून हे केस पांढरे झाले आहेत….मला सल्ला देण्यापेक्षा आपलं काय झालं आहे हे तपासावं….जाईल तिकडे लोक तुम्हाला आडवत असून प्रश्न विचारत आहेत. मित्रपक्षाचे लोक तुम्हाला जवळ करत नाहीत. मतदार संघात माझा माझा राऊंड पुर्ण झाला असताना अजून तुमते दिवस समजूत काढण्यात जात असल्याची जाणिव राजू शेट्टी यांनी धैर्यशील माने यांना करून दिली.
महाविकास आघाडीवर हल्लाबोल…
माध्यमांनी राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीबाबतच्या राजकिय परिस्थितीवर बोलतान ते म्हणाले, “पहिल्यापासूनच महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही हा निर्णय पक्का होता. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष राज्यामध्ये होतं तेव्हा उसाची एफआरपी तीन टप्प्यात करण्यात येणार होती. यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर वरवंटा फिरवणार होता. आम्ही संघर्ष करून एकरकमी एफआरपी घ्यावी लागली. शक्तीपीठ महामार्गासाठी महाविकास आघाडीने पायघड्या घालून ठेवल्या होत्या. आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकार मध्ये अशा पद्धतीचे कायदे होत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत का राहावं म्हणून आम्ही बाहेर पडलो.” असा थेट आरोप राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर केला.
उद्धव ठाकरे यांच्याकडून अनुकूलता पण…
गेल्या तीन निवडणुका आपण हातकणंगले मतदारसंघातून लढलो असून मत विभागणीची कोणतीच काळजी नाही. मात्र यामध्ये भाजप विरोधी मतांची भर पडल्यास निवडणूक सुखकर होईल या आशेने महाविकास आघाडीबरोबर चर्चा केली. दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या भेटीत त्यांनीही अनुकूलता दर्शवली मात्र कुठून तरी चाव्या फिरल्या. त्यांचा आणि आमचा उद्देश एकच होता मात्र त्यांनी उमेदवार दिल्यामुळे आपली कोणतीच तक्रार नसल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
जातीचं कार्ड खेळा पण….
वंचित बहूजन आघाडीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डी सी पाटील यांच्या रूपाने उमेदवारी दिला आहे. याबाबत राजू शेट्टी यांना छेडले असता त्यांनी कोणाला जातीचे कार्ड घेऊन निवडणुकीत उतरायचं असेल तर त्यांनी खुशाल उतरावं.पण त्यांनी हा शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा असल्याचं ध्यानात ठेवाव असा इशारा दिला आहे.