हार्दिक पंड्याला दंड

हार्दिक पंड्याला दंड

वृत्तसंस्था/ मुल्लानपूर
सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे गुरुवारी झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला षटकांची गती राखता न आल्याने या संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला स्पर्धा आयोजकांनी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुंबई इंडियन्सने हा सामना शेवटच्या षटकात जिंकला. आता मुंबई इंडियन्सचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सबेरोबर जयपूर येथे 22 एप्रिलला होणार आहे.