पापुआ न्यू गिनीचा आज युगांडाशी सामना

पापुआ न्यू गिनीचा आज युगांडाशी सामना

वृत्तसंस्था/ जॉर्जटाऊन
टी-20 विश्वचषकातील आजचा तिसरा सामना पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात होणार आहे. पापुआ न्यू गिनीने वेस्ट इंडिजविऊद्ध दमदार प्रदर्शन केले आणि दोन वेळच्या विजेत्यांवर त्यांच्या गोलंदाजांनी प्रचंड दबाव आणला. असद वालालच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव झाला असला, तरी आज ते विजय मिळविण्याची आशा बाळगतील. दुसरीकडे, पदार्पण करणाऱ्या युगांडाचा सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून 125 धावांनी पराभव झाला. कर्णधार ब्रायन मसाबाच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी त्यात लढण्याची तयारी दाखविली असली, तरी फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करली. शिवाय त्यांचे क्षेत्ररक्षणही खराब राहिले. सदर आफ्रिकन राष्ट्र आज यात सुधारणा करू पाहील.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वा.