पल्लवी धेंपे यांनी घेतले श्रीमहालक्ष्मी देवीचे दर्शन

पल्लवी धेंपे यांनी घेतले श्रीमहालक्ष्मी देवीचे दर्शन

पणजी : भारतीय जनता पार्टीने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिल्यानंतर काल सोमवारी त्यांनी पणजीतील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे पती उद्योगपती श्रीनिवास धेंपे, पणजी शिमगोत्सव समितीचे मंगलदास नाईक, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. पल्लवी धेंपे यांनी श्री महालक्ष्मी देवीला साकडे घालत विजयासाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी समस्त नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. अनेकांशी त्यांनी यावेळी मनमोकळी चर्चा केली. काही महिलांशीही त्यांनी हितगुज केले.